पश्चिम उपनगरातून शिंदे गटाचे हजारो शिवसैनिक मेळाव्याला होणार रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 16:29 IST2022-10-05T16:28:22+5:302022-10-05T16:29:02+5:30
ShivSena Dasara Melava: आज बिकेसी वर होणारा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पश्चिम उपनगरातून हजारो शिवसैनिक आज दुपारी चारच्या सुमारास वाजत गाजत गुलाल उफहळत जल्लोष करत रवाना होणार आहे.

पश्चिम उपनगरातून शिंदे गटाचे हजारो शिवसैनिक मेळाव्याला होणार रवाना
- मनोहर कुंभेजकर
मुंबई -आज बिकेसी वर होणारा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पश्चिम उपनगरातून हजारो शिवसैनिक आज दुपारी चारच्या सुमारास वाजत गाजत गुलाल उधळत जल्लोष करत रवाना होणार आहे.
विभाग क्रमांक १ दहिसर,बोरिवली,मागाठाणे मधून २५० बसेस मधून सुमारे १५००० शिवसैनिक व महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी बिकेसीला आज दुपारी ४ वाजता वाजत गाजत जल्लोषात जाणार आहे.तर अनेक शिवसैनिक बाईक व खाजगी वाहनातून,तर काही ट्रेनने येथे जाणार असल्याची माहिती शिंदे गटाचे मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे आमदार-विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी लोकमतला दिली.
आज मुंबई सह महाराष्ट्रातून सुमारे ३ लाखांहुन अधिक शिवसैनिक व महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास भाषण ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या व उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी दिली.न भूतो न भविष्यती असा अती विराट मेळावा आज बिकेसीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चांदीवली विधानसभा मतदार संघातून ५० बसेस मधून सुमारे ३००० शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळाव्याचे भाषण ऐकण्यासाठी जाणार आहे अशी माहिती आमदार व विभागप्रमुख दिलीप लांडे यांनी दिली.