Join us

'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 06:33 IST

आपले चांगले चाललेले सरकार गद्दारांनी सत्तेच्या लोभापायी पाडले. सध्या अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपले चांगले चाललेले सरकार गद्दारांनी सत्तेच्या लोभापायी पाडले. शिवसेना संपवायला निघालेल्या आणि तिकडे बसून सत्तेची पदे भोगणाऱ्यांना परत घेणार नाही आणि उमेदवारीही देणार नाही. मात्र, अनेकजण धाकधपटशामुळे, दिशाभूल झाल्याने तिकडे गेले. मोहजालामुळे तिकडे खेचले गेलेल्या अनेकांचे डोळे आता उघडत आहेत. त्या सर्वांना परत पक्षात घेणार असल्याचे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केले. 

कल्याण-डोंबिवलीतील शिंदेसेनेचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रविवारी उद्धवसेनेत प्रवेश केला. यावेळी विनायक राऊत, वरुण सरदेसाई यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तुमच्या डोळ्यावर झापड बांधली गेली होती. आता सगळ्यांचे डोळे उघडले हे चांगले झाले. तुम्ही त्यांच्या आहारी गेला होता ते हिंदुत्व, ते विचार बाळासाहेबांचे नाहीत हे तुमच्याही लक्षात आले. सध्या अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४उद्धव ठाकरेशिवसेना