लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या प्रवाशांनाही रेल्वे भाड्यात मोठी सवलत दिली जाते. दिव्यांग, कॅन्सर, हृदयविकार, चॅलेसेमिया, किडनी प्रत्यारोपण अशा विविध आजारांवरील उपचारांसाठी प्रवास करणाऱ्या रुग्णांसाठी ५० ते ७५ टक्के सवलत दिली जाते. त्याकरिता कोण पात्र, किती सूट, कोणती कागदपत्रे लागतात आणि मंजुरी प्रक्रिया कशी, याबाबत रेल्वेने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या.
रेल्वे प्रवासादरम्यान सुविधांसाठी काही पात्रता निकषही रेल्वेने निश्चित केले आहेत. उपचारासाठी प्रत्यक्ष प्रवासाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करणारे सरकारी किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयाचे मूळ प्रमाणपत्र सर्वप्रथम सादर करावे लागते. सप्टेंबरमध्ये ३,९९५ प्रवाशांनी घेतला लाभ ते ७५ टक्के सवलत उपचार प्रवासासाठी रुग्णांना मिळते.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो. फक्त सप्टेंबरमध्येच मध्य रेल्वेवर ३,९९५ प्रवाशांनी या सवलतींचा लाभ घेतला आहे. पात्र प्रवाशांनी खरी कागदपत्रे सादर करून या सुविधेचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा, एवढीच अपेक्षा आहे.'
रेल्वे प्रवासात वैद्यकीय सवलतीची माहिती
| रुग्णाचा प्रकार | प्रवासाचा वर्ग | सवलतीची टक्केवारी |
| कॅन्सर (कर्करोग) रुग्ण | 3AC / स्लीपर / जनरल | १००% |
| First AC आणि Second AC | ५०% | |
| किडनी डायलिसिस/प्रत्यारोपण रुग्ण | स्लीपर / जनरल | १००% |
| AC (एसी) | ७५% | |
| हृदय शस्त्रक्रिया (Heart Surgery) रुग्ण | स्लीपर / जनरल | १००% |
| AC (एसी) | ७५% |