हे आहेत मुंबईतील कोरोना संसर्ग वाढलेले नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक रुग्ण चेंबूरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 01:37 AM2021-02-18T01:37:32+5:302021-02-18T01:37:56+5:30

CoronaVirus News : गेल्या महिन्यात दररोज सरासरी तीनशे रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून ही संख्या दररोज ६०० वर पोहोचली आहे. मुंबईतल्या काही भागांत रुग्णांची संख्या वाढली असून, कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत.

These are the new hotspots in Mumbai where corona infections have increased; Most patients in Chembur | हे आहेत मुंबईतील कोरोना संसर्ग वाढलेले नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक रुग्ण चेंबूरमध्ये

हे आहेत मुंबईतील कोरोना संसर्ग वाढलेले नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक रुग्ण चेंबूरमध्ये

Next

मुंबई : लोकल सेवा सुरू झाल्यापासून मुंबईतील काही भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळकनगर हे भाग पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहेत. बाधित रुग्ण आढळून आलेल्या ८५ चाळी-झोपडपट्टी आणि ९९२ इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.
गेल्या महिन्यात दररोज सरासरी तीनशे रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून ही संख्या दररोज ६०० वर पोहोचली आहे. मुंबईतल्या काही भागांत रुग्णांची संख्या वाढली असून, कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत.
बोरीवलीत सर्वाधिक ४०८ बाधित रुग्ण सापडले, तर अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या ३७८ वर पोहोचली आहे. या परिसरातील १०० इमारती सील केल्या आहेत.
कांदिवली, चारकोपमध्ये ३४५, तर मालाड, मनोरी इथे ३३८ कोरोना रुग्ण आहेत. मुलुंडमध्ये २९२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे २०२ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
घाटकोपर, विद्याविहार आणि पंतनगर या भागातील १६२ इमारती सील करण्यात आल्या. १४ झोपडपट्ट्या आणि चाळी बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. येथे २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भांडुप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर येथील १० झोपडपट्ट्या आणि चाळी बाधित आहेत. माहीममध्ये बुधवारी १७ बाधित रुग्ण सापडले.

चेंबूरमधील ५५० इमारतींना नोटीस
- चेंबूरमध्ये रुग्णवाढ सर्वाधिक असल्याने पालिकेने येथील तब्बल ५५० गृहनिर्माण सोसायट्यांना नोटीस बजावली.  
- मुंबईत सध्या रुग्णवाढीचा सरासरी दर ०.१६ टक्का इतका असताना चेंबूरमध्ये ताे ०.२६ टक्का आहे.  
- चेेंबूरमध्ये बाहेरील व्यक्तींना सोसायटीत मर्यादित प्रवेश द्यावा. सोसायटीत येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येक रहिवाशाची शारीरिक तापमान तपासणी करावी. इमारतीमधील रहिवाशाला कोरोनाची लागण झाल्यास नियमानुसार १४ दिवस विलगीकरण करावे. बाधिताच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींची चाचणी करावी, असे नाेटिसीत  नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: These are the new hotspots in Mumbai where corona infections have increased; Most patients in Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.