मंत्र्यांत एकवाक्यता नाही; औषध खरेदी रखडली

By अतुल कुलकर्णी | Published: September 9, 2018 06:06 AM2018-09-09T06:06:07+5:302018-09-09T06:06:45+5:30

हाफकिनमार्फत सुरू असलेल्या औषध खरेदीमुळे सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीवर टाच आल्याने ही यंत्रणाच बंद पाडण्यासाठी ते कामाला लागले.

There is no unanimity between ministers; Drug purchase stops | मंत्र्यांत एकवाक्यता नाही; औषध खरेदी रखडली

मंत्र्यांत एकवाक्यता नाही; औषध खरेदी रखडली

Next

- अतुल कुलकर्णी 
मुंबई : हाफकिनमार्फत सुरू असलेल्या औषध खरेदीमुळे सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीवर टाच आल्याने ही यंत्रणाच बंद पाडण्यासाठी ते कामाला लागले. दुसरीकडे औषध खरेदी धोरण राबविण्याची जबाबदाºयाच निश्चित न केल्याने आरोग्यमंत्री दीपक सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यात एकवाक्यता नसल्याने औषध खरेदीचा गोंधळ झाला आहे.
सावंत आणि महाजन या दोन मंत्र्यांकडील विभाग औषधांची मागणी बापट यांच्याकडे असणाºया हाफकिनला देतात. मागणी देताना सुरुवातीला या विभागांनी घातलेला गोंधळ आजपर्यंत हाफकिनला निस्तारता आलेला नाही. याबद्दल मंत्री बापट म्हणाले, सोमवारपर्यंत या विषयीचा सगळा तपशिल देण्याचे आदेश आपण हाफकिनला दिले आहेत.
>फाईल कोणाकडे?
मुख्यमंत्री कार्यालयाने वैद्यकीय शिक्षण व आरोग्यमंत्र्यांकडे अभिप्राय मागितला होता. मात्र आरोग्यमंत्र्यांनी ती फाईल काही महिने स्वत:कडेच ठेवली. सध्या ती फाईल नेमकी कोणाकडे आहे, याचा कोणालाच थांगपत्ता नाही.

Web Title: There is no unanimity between ministers; Drug purchase stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.