Join us

शिवसेनेच्या ४० आमदारांनंतर तब्बल ११ खासदार शिंदेंच्या गळाला?; कुणाकुणाचा समावेश पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 14:24 IST

शिवसेनेच्या आमदारांच्या नाराजीनंतर आता काही खासदारही नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई- राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे एकूण ५० आमदार आणि भाजपानं एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमच्या व्हिपचं उल्लंघन करणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्याकडे की देवेंद्र फडणवीसांकडे?; एकनाथ शिंदे म्हणतात...

विधानसभेत बहुमत सिद्ध करताना आमच्या व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. खरी शिवसेना आम्ही आहोत. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. 

शिवसेनेच्या आमदारांच्या नाराजीनंतर आता काही खासदारही नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार शिवसेनेच्या १८ लोकसभेच्या खासदारांपैकी ११ खासदार शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बहुसंख्य खासदारही शिंदे गटाकडे गेल्यास मूळ शिवसेनेचा ताबा कोणाकडे याबाबतही प्रश्न निर्माण होणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' मिळवण्यासाठीदेखील शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. 

'उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर...'; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

शिंदे गटात पुढील खासदार जाण्याची शक्यता-

श्रीकांत शिंदे ( कल्याण )राजन विचारे ( ठाणे )राजेंद्र गावित ( पालघर ) राहुल शेवाळे ( दक्षिण मध्य मुंबई ) हेमंत गोडसे ( नाशिक )सदशिव लोखंडे ( शिर्डी )श्रीरंग बारणे ( मावळ )  भावना गवळी ( यवतमाळ)कृपाल तुमाने ( रामकेट ) प्रतापराव जाधव ( बुलढाणा ) हेमंत पाटील ( हिंगोली )

दरम्यान, १८ जुलै २०२२ रोजी देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या पदासाठी यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू हे दोन उमेदवार उभे आहेत. मुर्मू या आदिवासी समाजातील असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहुमुल्य योगदान आहे. त्यांनी शिक्षिका म्हणून सुरुवात केली व त्यानंतर अरोबिंदो इंटीग्रल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट, रायंगपूर येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून काम केले आहे. या नंतर त्या ओडीसा सरकारच्या सिंचन विभागात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत होत्या. द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून महत्वाची कामगिरी सुध्दा पार पाडलेली आहे, असे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रात म्हटले आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती असताना एन.डी.ए. च्या उमेदवाराला पाठिंबा न देता प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातील असल्या कारणाने त्यांना पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांना देखील त्यांनी असाच पाठिंबा दिला होता. मुर्मू यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता आपण मुर्मू यांना पाठिंबा दयावा व तसे आदेश सर्व शिवसेनेच्या खासदारांना द्यावेत, अशी मागणी करत असल्याचे शेवाळे म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना