Join us

"चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 14:41 IST

पृथ्वीराज चव्हाण यांचा खुलासा

मुंबई - अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी आपण केली नसल्याचे सांगत, काही नेते आपल्या नावाचा वापर करून बातम्या देत आहेत, असा खुलासा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्याऐवजी अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी काँग्रेसमधील काही नेत्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. त्या नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण असल्याचीही चर्चा होती. मात्र, आपण अशी मागणी केली नसल्याचा खुलासा चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :अशोक चव्हाणकाँग्रेसपृथ्वीराज चव्हाण