Join us

मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:44 IST

निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची घटिका जवळ येऊन ठेपली आहे.

मुंबई : मुंबई व उपनगरातील ज्या मतदान केंद्रांवर मागील निवडणुकांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे, अशा ७६ केंद्रांना आता क्रिटिकल मतदान केंद्रे म्हणून घोषित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या ६ निकषांप्रमाणे या केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून, यंदा येथील मत टक्का वाढविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. यातील १३ केंद्रे शहर विभागात, तर ६३ केंद्रे उपनगरात असल्याची माहिती त्यांनी दिली.

निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची घटिका जवळ येऊन ठेपली आहे. पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईतील निवडणुकीची जबाबदारी असलेल्या पालिका प्रशासनाने यासाठी कंबर कसली असून, या तयारीबाबत गगराणी यांनी माहिती दिली. 

प्रचार समाप्तीनंतर ज्या ठिकाणी उमेदवारांचे बूथ असतील, ते मतदान केंद्राच्या २०० मी. परिसराच्या आत नसावेत. प्रत्येक बूथवर १ टेबल, २ खुर्च्या एवढीच परवानगी राहील. याशिवाय उमेदवाराचे चिन्ह किंवा ओळख प्रदर्शित होईल, असे कोणतेही प्रचार साहित्य येथे ठेवता येणार नाही. 

मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था व बंदोबस्तासाठी एकूण २५ हजार ६९६ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर किमान ५ कर्मचारी असणार आहेत. यंदा एकही मतदान केंद्र संवेदनशील (सेन्सिटिव्ह) नसल्याचेही पालिका आयुक्तांनी यावेळी सांगितले.

मतदान केंद्रावर सुविधा 

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रतीक्षालय, बसण्यासाठी व्यवस्था, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प, मदतीसाठी दिव्यांगमित्र स्वयंसेवक, मैदानाच्या ठिकाणी मंडप, कचरापेटी, पंखे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक फलक, मेडिकल किट.

१२८४ ठिकाणी दिव्यांग मतदारांची ने-आण करण्यासाठी नि:शुल्क वाहतूक सुविधा. त्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात ६७१ ठिकाणी ७० वाहने, उपनगर जिल्ह्यात ६१३ ठिकाणी ९२७ वाहनांची व्यवस्था.

तपशील - शहर - उपनगर

मतदानाची ठिकाणे - ६७१ - १४१४मतदान केंद्र - १५३८ - ७५७९महिला संचालित - १२ - २६युवा संचालित - १२ - २६दिव्यांग संचालित - ८ - ०बॅलेट युनिट - ३,०४१ - ११,१३१कंट्रोल युनिट - ३०४१ - ९०७९व्हीव्हीपॅट - ३२९४ - ९८३७ नियुक्त कर्मचारी - ११,५८५ - ३५,२३१सूक्ष्म निरीक्षक - ६३९ - १,६०२गृह मतदान - २१५४ - ४११८

तपशील -    मुंबई शहर - मुंबई उपनगर

मतदार - २५,४३,६१० - ७६,८६,०९८ पुरुष - १३,६,९०४ - ४१,०१,४५७ महिला - ११,७७,४६२ - ३५,८३,८०३ तृतीयपंथी - २४४ - ८३८ओव्हरसीज - ४०७ - १८८१दिव्यांग - ६३८७ - १७,५४०८५ वर्षांवरील - ५३,९९१ - ९२,८६८सर्व्हिस वोटर -३८८ - १०८७

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकआयुक्तमुंबई