‘...मग दाखवतो शिवसेना काय आहे ते’; उद्धव ठाकरे झाले आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 09:17 IST2022-09-18T09:15:45+5:302022-09-18T09:17:28+5:30

शिवसेना भवनमध्ये आयोजित विभागप्रमुख व उपविभाग प्रमुखांशी ठाकरे यांनी संवाद साधला

'...then shows what Shiv Sena is', Uddhav Thackeray on Eknath Shinde | ‘...मग दाखवतो शिवसेना काय आहे ते’; उद्धव ठाकरे झाले आक्रमक

‘...मग दाखवतो शिवसेना काय आहे ते’; उद्धव ठाकरे झाले आक्रमक

लाेकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मला समोरून आव्हान आले की चेव चढतो. शिवसेना संपविण्याची भाषा उघडपणे केली जात आहे आणि सगळे एकत्र होत आहेत. सगळ्यांनी एकत्र व्हावे, हीच माझी अपेक्षा होती. विरोधकांना वेगवेगळे मारण्यामध्ये काही गंमत नसते. सर्वांनी एकत्र या, मग तुम्हाला दाखवतो शिवसेना काय आहे ते, या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आव्हान दिले.

शिवसेना भवनमध्ये आयोजित विभागप्रमुख व उपविभाग प्रमुखांशी ठाकरे यांनी संवाद साधला. वेदांता-फॉक्सकॉन वादावरही त्यांनी भाष्य केले. सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातने पळवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

Web Title: '...then shows what Shiv Sena is', Uddhav Thackeray on Eknath Shinde