महिलेने केला सरकारी वकिल असल्याचा बनाव; व्यवसायिकासह ७ जणांना लावला ९.८६ कोटींचा चुना

By गौरी टेंबकर | Published: December 19, 2023 11:06 AM2023-12-19T11:06:04+5:302023-12-19T11:06:15+5:30

आरोपी महिलेने कस्टम विभागाने जप्त केलेले सोन्याचे दागिने स्वस्त दरात देण्याचे आश्वासन देत हा प्रकार केला. 

The woman pretended to be a government lawyer | महिलेने केला सरकारी वकिल असल्याचा बनाव; व्यवसायिकासह ७ जणांना लावला ९.८६ कोटींचा चुना

महिलेने केला सरकारी वकिल असल्याचा बनाव; व्यवसायिकासह ७ जणांना लावला ९.८६ कोटींचा चुना

मुंबई: सरकारी वकील असल्याचे भासवून शहरातील महिला व्यावसायिकासह ७ जणांना तब्बल ९.८६ कोटी रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी ५६ वर्षीय महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेने कस्टम विभागाने जप्त केलेले सोन्याचे दागिने स्वस्त दरात देण्याचे आश्वासन देत हा प्रकार केला. 

अटक महिलेचे नाव श्वेता अनिल बडगुजर (५६) असे असून ती अंधेरी पश्चिमच्या मॉडेल टाऊन येथे राहणारी आहे. या प्रकरणात तिची मैत्रीण स्वाती प्रकाश जावकर आणि मुलगा दर्शन असे आणखी दोन आरोपी फरार आहेत. या टोळक्याने वांद्रे, ओशिवरा, अंधेरी, वाकोला आणि मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही असेच प्रकार केले आहेत. कार्यपद्धतीमध्ये अटक आरोपी श्वेता तसेच फरार स्वाती यांनी सत्र न्यायालयाबाहेर त्या सरकारी वकील असल्याचे भासवत अनेक लोकांशी संपर्क साधला. श्वेताचा भाऊ पीयूष प्रधान कस्टममध्ये मोठ्या पदावर आहे तर ओळखीची महिला माधवी कस्टम अधिकारी असून त्यांनी पकडलेले सोने लिलावात स्वतात ओळखीने मिळवून देते असे आमिष तिने त्यांना दाखवले. पीडिताला विश्वासात घेण्यासाठी आरोपी स्थानिक दुकानातून सोने खरेदी करून व्यावसायिकाला स्वस्त दरात विकायची.

आरोपी श्वेता आणि स्वाती यांनी अंधेरी परिसरातील एका व्यावसायिकालाही ऑक्टोबर महिन्यात असेच गंडवले. श्वेताने स्थानिक ज्वेलरकडून काही सोने खरेदी करत व्यावसायिक महिलेला देत तिचा विश्वास जिंकला. नंतर तिच्यासह तिच्या परिचितांकडून सुमारे ९ कोटी ८६  लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, जेव्हा पीडितेने तिच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली तेव्हा तिला आणि तिच्या पतीला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. मात्र, पीडितेने डी एन नगर पोलिसात धाव घेतल्यावर ऑक्टोबर महिन्यात एफआयआर दाखल झाला. डी एन नगर पोलिसांनी तिला अनेकदा पकडण्याचा प्रयत्न केला पण ती नाव बदलत असल्याने त्यात ते अपयशी ठरले. 

...म्हणून खाल्ल्या झोपेच्या गोळ्या! 

डी.एन.नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंजली वाणी, संतोष मासाळ, कॉन्स्टेबल राणे, सुप्रिया भोसले, गायत्री चौधरी यांची टीम श्वेताला पकडण्यासाठी पुण्याला गेले. तिथल्या चाडणनगर पोलिसांना माहिती देत तिला अटक करणार हे समजले. तेव्हा ती अटक टाळण्यासाठी तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. तिच्यावर वांद्रे येथे ३, मुलुंड १, वाकोला १ ओशिवरा १ असे डी एन नगर मिळून एकूण ७ एफआयआर दाखल आहेत.

Web Title: The woman pretended to be a government lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.