पकडायला आलेल्या दोघांना चोराने चाकू मारून केले जखमी

By धीरज परब | Published: March 29, 2023 08:25 PM2023-03-29T20:25:34+5:302023-03-29T20:25:42+5:30

काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

The two who came to catch thief were stabbed and injured by the thief | पकडायला आलेल्या दोघांना चोराने चाकू मारून केले जखमी

पकडायला आलेल्या दोघांना चोराने चाकू मारून केले जखमी

googlenewsNext

मीरारोड - घोडबंदर मार्गावरील काजूपाडा एका घरात चोरी करण्यास शिरलेल्या चोरास पकडण्याचा प्रयत्न केला असता चोराने चाकूने वर करून दोघांना जखमी केल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

काजुपाडा मराठी शाळेजवळ राहणारे अरुण वीर यांच्या घरातील स्वयंपाक घरास लावलेले टाळे दोघे चोर सोमवारी पहाटे तोडत होते . सीसीटीव्ही मध्ये ते दिसून आले मात्र चोरांनी अरुण झोपलेल्या खोलीस बाहेरून काडी लावली होती . 

त्यांनी शेजारी राहणारे सासरे यांना कॉल करून मदतीसाठी येणास सांगितले. सासरे बाहेर आले असता चोर पळून जाऊ लागले . त्यांनी दाराची कडी काढल्यावर बाहेर आलेल्या अरुण यांनी एकास पाठलाग करून पकडले . मात्र चोराने चाकूने अरुण यांच्या डोके व खांद्यावर वार केल्याने ते खाली पडले  त्यांचे एक नातलग आले असता त्यांच्या हातावर देखील चाकू मारला . पोलीस दोन्ही चोरांचा शोध घेत असून जखमी अरुण व नातलगावर उपचार करण्यात आले . 

 

Web Title: The two who came to catch thief were stabbed and injured by the thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.