Join us
Daily Top 2Weekly Top 5

महामुंबईतील शिक्षकांचा शासनाकडून होणार गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 07:30 IST

Mumbai News: राज्य सरकारचे २०२३-२४ चे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केले. एकूण ११० शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

 मुंबई - राज्य सरकारचे २०२३-२४ चे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केले. एकूण ११० शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

३९ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, १९ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक, ८ आदर्श शिक्षिका, २ विशेष शिक्षक (कला व क्रीडा), १ दिव्यांग शिक्षक किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक, तर २ स्काऊट-गाइड शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. राज्य निवड समितीने ही निवड केली. शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला मुंबईत समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. प्रत्येक शिक्षकास पुरस्कारादाखल एक लाख रुपये देण्यात येतील.

माध्यमिक शिक्षक : स्मिता शिपूरकर, एच. के. गिडवाणी कॉस्मोपॉलिटन इंग्लिश हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज मुलुंड (मुंबई); पौर्णिमा माने, के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल, परळ-पूर्व (मुंबई); रजनीकांत भट्ट, भवन्स कनिष्ठ महाविद्यालय, अंधेरी-पश्चिम (मुंबई); अरुणा पंड्या (मुख्याध्यापक), श्री राम वेल्फेअर सोसायटीज हायस्कूल, अंधेरी-पश्चिम (मुंबई); मनोज महाजन, आयइएस, नवी मुंबई हायस्कूल, (ठाणे); रंजना देशमुख (मुख्याध्यापक), अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, कर्जत (रायगड), रामकृष्ण पाटील, पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासा (पालघर).

प्राथमिक शिक्षक : सविता जगताप, देवनार कॉलनी मनपा इंग्रजी शाळा क्रमांक ०१, गोवंडी (मुंबई); आशा ब्राहाणे, मढ मराठी मुंबई पब्लिक स्कूल, मालाड (मुंबई); पूर्वा संखे, मुंबई पब्लिक स्कूल, मालाड कन्या उच्च प्राथमिक मराठी शाळा, मालाड (मुंबई); लक्ष्मण घागस, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, तोंडली (ठाणे); सचिन दरेकर, रायगड जिल्हा परिषद शाळा, गोळेगणी (रायगड); शिल्पा वनमाळी, जिल्हा परिषद शाळा, आगवन नवासाखरा (पालघर).

शिक्षक (प्राथमिक) : सुधीर भोईर, जिल्हा परिषद शाळा रातांधळे (ठाणे); सचिन शिंदे, श्रमजीवी जनता विद्यामंदिर, पोशीर (रायगड); रवींद्र जाधव, जि.प. शाळा, दाभोण पाटीलपाडा (पालघर).

विशेष शिक्षक - कला शिक्षक : नीता जाधव, पंतनगर महानगरपालिका शाळा, घाटकोपर- पूर्व (मुंबई)आदर्श शिक्षक : गौरी शिंदे, गोरेगाव पूर्व मनपा माध्यमिक विद्यालय, गोरेगाव- पूर्व (मुंबई)

टॅग्स :शिक्षकशिक्षणमुंबई