Join us

Weather: थंडीचा कडाका आणखी वाढणार, पुणे राज्यात सर्वात थंड, कोकणात हलक्या पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 07:47 IST

Weather: उत्तरेकडील राज्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असून, तेथील थंड वारे दक्षिणेच्या दिशेने सरकू लागल्याने, राज्यातील तापमानात झपाट्याने घट होत आहे.

पुणे/मुंबई : उत्तरेकडील राज्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असून, तेथील थंड वारे दक्षिणेच्या दिशेने सरकू लागल्याने, राज्यातील तापमानात झपाट्याने घट होत आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. त्याच वेळी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बहुतांश शहरांचे किमान तापमान घसरत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात अनेक शहरांचे किमान तापमान १७ अंशांखाली आले असून, यात २६ शहरांचा समावेश आहे. 

उत्तर भारतात होत असलेल्या हवामान बदलामुळे सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, वातावरणात फार काही बदल होणार नाहीत. हे वातावरण कमी झाले की, तापमानात किंचित घसरण होईल.   - माणिकराव खुळे,     माजी अधिकारी, हवामान खाते.

शहरांचे किमान तापमान सोलापूर १७.७     ।    उदगीर १५,कोल्हापूर १७.८     ।    मालेगाव १७.२उस्मानाबाद १६.४     ।    नाशिक १४.३नांदेड १६.४     ।    जळगाव १७पुणे १३.३     ।    जालना १६.२औरंगाबाद १४.२     ।    बारामती १३.९महाबळेश्वर १३.४     ।    परभणी १५.५सांगली १६.९     ।    अमरावती १७बुलढाणा १७.४     ।    चंद्रपूर १७.६गडचिरोली १५.६     ।    गोंदिया १६नागपूर १५     ।    वाशिम १७ यवतमाळ १५     ।    मुंबई २३.२    अंश सेल्सिअस

 

टॅग्स :हवामानमहाराष्ट्र