रिक्षावाला आडवा आला, शिवसेना भवनात वळताना आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकवाला धडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 16:42 IST2023-06-28T16:41:45+5:302023-06-28T16:42:19+5:30
काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. आदित्य ठाकरेंची कार आणि पोलिस कार आदी ताफा शिवसेना भवनाकडे वळत होते.

रिक्षावाला आडवा आला, शिवसेना भवनात वळताना आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकवाला धडकला
सध्या शिवसेना भवनामध्ये ठाकरे गटाच्या हालचाली वाढलेल्या आहेत. समान नागरी कायद्याविरोधात आज पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते. महापालिका निवडणुकीची तयारी, राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारीला वेग आला आहे. अशातच आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेशिवसेना भवनात येत असताना त्यांच्या कारला मोटरसायकलवाला धडकला.
काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. आदित्य ठाकरेंची कार आणि पोलिस कार आदी ताफा शिवसेना भवनाकडे वळत होते. तेव्हा मागाहून ओव्हरटेक करत असलेला बाईकस्वार आदित्य यांच्या कारवर धडकला. ठाकरेंची कार उजवीकडे वळत असताना बाईकस्वाराने ब्रेक मारला, त्याची बाईक घसरली आणि कारच्या पुढच्या टायरवर आदळली.
आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकस्वार धडकला... शिवसेना भवनासमोरचीच घटना. #AdityaThackeray#Accident#mumbai#ShivSena#ShivsenaUBThttps://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/7iOZwD3Cze
— Lokmat (@lokmat) June 28, 2023
या बाईकस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिथे उपस्थित असलेल्यांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्यामध्ये रिक्षावाला आडवा आला, नंतर बाईकवाल्याने आदित्य ठाकरेंच्या कारला धडक दिली असे बोलताना ऐकायला येत आहे.