सुनेसह मुलानेच काढले वृद्ध आईला घराबाहेर

By मनीषा म्हात्रे | Published: September 24, 2022 06:04 PM2022-09-24T18:04:48+5:302022-09-24T18:04:56+5:30

सुनेसह मुलानेच ७७ वर्षीय आईलाच मालकीच्या घरातून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये समोर आली आहे.

The old mother was taken out of the house by the son along with the daughter-in-law | सुनेसह मुलानेच काढले वृद्ध आईला घराबाहेर

सुनेसह मुलानेच काढले वृद्ध आईला घराबाहेर

googlenewsNext

मुंबई :

सुनेसह मुलानेच ७७ वर्षीय आईलाच मालकीच्या घरातून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी दोघांविरोधात शुक्रवारी गुन्हा नोंदवला आहे.  

घाटकोपरच्या सर्वोदय नगर परिसरात ७७ वर्षीय लक्ष्मी या राहण्यास आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार,  मुलगा भास्कर व त्याची दुसरी पत्नी छाया हे दोघेही वारंवार अपमानास्पद वागणुक देत  मारहाण करायचे. ३० ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास दोघांनीही त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर शिवीगाळ करत रिक्षात बसवून मुलुंडला  नातीकडे सोडले. तसेच टिळकनगरच्या घरी पुन्हा यायचे नाही, आली तर तुझ्याकडे  बघतो " अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी मुलीकडे धाव घेतली. मात्र, हक्काच्या घरातून घराबाहेर काढल्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

Web Title: The old mother was taken out of the house by the son along with the daughter-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.