Join us  

मोबाईल बंद ठेवला आणि लक्ष्मण जगताप आमदार झाले, अजितदादांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 3:12 PM

भाजपचे पिंपरी चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी निधन झाले.

भाजपचे पिंपरी चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या ३५ वर्षापासून ते पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सक्रिय होते, त्यांनी भाजप अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही काम केले आहे. यापूर्वी ते अजित पवार यांचे जवळचे म्हणून ओळखले जात होते. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जगताप यांच्या घरी भेट देऊन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माध्यमांशी बोलताना पवार यांनी लक्ष्ण जगताप यांचा निवडणुकीतील एक किस्सा सांगितला.   

'माझा आणि पंपरी चिंचवडचा संबंध १९९१ साली आला. तेव्हा मी खासदार होतो. त्यावेळी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात काम सुरू केले होते. यात लक्ष्मण जगताप हेही होते. त्यांनी त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदारीवर मजबुतीने काम केले, अजित पवार यांनी जुन्या आठवणी सांगितल्या.

... म्हणून महाराष्ट्रातील मुलांचे लग्न होत नाहीत, शरद पवारांनीचं सांगितलं राज'कारण'

यावेळी अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांच्या पहिल्या निवडणुकीतील एक किस्सा सांगितला. 'आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्षपद होते. पुढ मी त्यांना निवडणुकीवेळी तु फॉर्म भर आणि मी सांगतोय तोपर्यंत तु फोन बंद ठेव असं सांगितलं. फॉर्म पाठिमागे घेईपर्यंत मी त्यांना फोन बंद ठेवायला लावला. त्यावेळी काँग्रेसला तिकीट जाण्याची शक्यता होती. मला खात्री होती त्या मतदार संघाच आमच्या विचारांचा उमेदवार निवडून येणार आहे. पण त्यावेळी ही जागा काँग्रेसला गेली. या निवडणुकीत लक्ष्मण जगताप मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. पुढच्या विधानसभा निवडणुकीतही हा मतदारसंघ काँग्रेसला गेला, पुन्हा लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणूनच ही निवडणूक जिंकली. अपक्ष निवडून येऊनही ते राष्ट्रवादीच्या विचारासोबत राहिले, असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

'तीन दिवसापूर्वी चिंचवडकरांना ऐकायला मिळाली. राजकीय जीवनात माझा आणि पंपरी चिंचवडचा संबंध १९९१ साली आला. तेव्हा मी खासदार होतो. त्यावेळी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात काम केले. यात लक्ष्मण जगताप होते. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदारीवर मजबुतीने काम केले, असंही अजित पवार म्हणाले.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपालक्ष्मण जगताप