Join us

घरात चोरी करणाऱ्याला मोलकरणीने दिले पकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:23 IST

...मात्र, त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने प्रसंगावधान राखत आरोपीला पकडून दिले. खेरवाडी पोलिसांनी अटक केली.

मुंबई : औद्योगिक न्यायालयात असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या घरी डल्ला मारण्याचा प्रयत्न एका चोराने केला. मात्र, त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने प्रसंगावधान राखत आरोपीला पकडून दिले. खेरवाडी पोलिसांनी अटक केली.तक्रारदार मैथिली सागावकर (४४) या वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये त्या राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार २ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कामावर निघून गेल्या. कामावर असताना घरकाम करणारी आशा कासारे (४०) हिने फोन करत सागावकर यांच्या घराचा कडी कोयंडा तुटलेला असल्याचे सांगितले. ती बोलत असताना एक व्यक्ती घरातून  बाहेर पडली. आशाने त्याला हटकले तेव्हा  सामान पिशवीत भरून पळण्याचा प्रयत्न केला. आशाने त्याच्या शर्टला पकडले. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस