माजी कामगाराने सोनाराला दिड कोटीना लुटले; देशी कट्ट्याचा दाखवत दोन किलो सोने पळवले 

By गौरी टेंबकर | Published: January 29, 2024 07:09 PM2024-01-29T19:09:59+5:302024-01-29T19:10:12+5:30

पाच जणांना परिमंडळ ८ कडून अटक, बालूसिंग आणि त्याचा साथीदार महिपाल यांचा पालघरच्या सफाळेमधून गाशा गुंडाळण्यात आला

The ex-worker robbed the goldsmith of half a crore; Two kilos of gold were stolen showing the gun in Mumbai | माजी कामगाराने सोनाराला दिड कोटीना लुटले; देशी कट्ट्याचा दाखवत दोन किलो सोने पळवले 

माजी कामगाराने सोनाराला दिड कोटीना लुटले; देशी कट्ट्याचा दाखवत दोन किलो सोने पळवले 

मुंबई: वाकोला पोलिसांच्या हद्दीत शस्त्राचा धाक दाखवत माजी कामगार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून सोनाराला जवळपास दिड कोटी रुपयांना लुबाडले. त्यांनी २ किलोहून अधिक सोने आणि चांदी पळवून नेली. याप्रकरणी परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्या पथकाने ५ जणांचा गाशा गुंडाळला. तसेच चोरीला गेलेल्या मुद्देमालासह देशी बनावटीचा कट्टाही हस्तगत करण्यात आला.

बालूसिंग परमार, महिपाल सिंग, लेरूलाल उर्फ लकी भिल, मंगीलाल भिल आणि कैलाश भिल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जे मूळचे राजस्थानचे राहणारे आहेत. यातील बालूसिंग आणि त्याचा साथीदार महिपाल यांचा पालघरच्या सफाळेमधून गाशा गुंडाळण्यात आला. वाकोला परिसरात १९ जानेवारी रोजी नरेश सोळंकी आणि त्यांची पत्नी घरात असताना बालूसिंग यांनी जवळपास १ कोटी ४३ लाख १४ हजार १३७ रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने पळून नेले होते.

याप्रकरणी वाकोला पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर उपायुक्त गेडाम आणि वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील केंगार, रितेश माळी, विलेपार्ले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कदम, निर्मलनगरचे फुंदे यांची पथके तयार करून ती तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली. त्यानुसार बालूसिंग आणि महिपाल यांना आधी ताब्यात घेत नंतर उर्वरित साथीदारांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला गेला.

Web Title: The ex-worker robbed the goldsmith of half a crore; Two kilos of gold were stolen showing the gun in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.