Join us

पक्ष, चिन्ह कुणाला मिळेल हे निवडणूक आयोग ठरवणार; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 17:47 IST

अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी बंडखोरी केली, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट आणि शरद पवार गटाला नोटीस बजावली होती. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे येणार असून, घड्याळ हे पक्षचिन्हही मिळेल, असा मोठा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पक्ष आणि चिन्हावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. 

राम मंदिरासंदर्भात आनंदाची बातमी, 'या' तारखेला उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी!

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आम्ही आमच्या भमिका मांडण्याच काम केलं. निवडणूक आयोगासमोर हे सगळ प्रकरण आहे. चिन्ह आणि पक्ष कुणाला मिळेल हे निवडणूक आयोग ठरवणार आहे, असंही अजित पवार म्हणाले. 

तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या तारखांच्या अगोदरच येणाऱ्या माहितीवरही आरोप केले आहेत.' सुनावणीच्या तारखा नेत्यांना कुठून मिळतात. काही लोक आता दावा करतात. सगळ्या संस्थांना स्वातंत्र आहे, पण आता या नेत्यांना तारखा कोण सांगत आहे, असंही सुळे म्हणाल्या. 

पक्षाचे चिन्ह असो वा नसो, आमच्याकडे शरद पवार आहेत

यालाच अहंकार म्हणतात. आम्हाला वाटायचे, भाजप आणि त्यांच्याच नेत्यांना अहंकार आहे. पण, भाजपत गेल्यावर अहंकार येण्यासाठी दोन महिने लागले. निवडणूक आयोग निकाल देईल, तेव्हा देईल. मात्र, निवडणूक आयोग आपलेच ऐकतात, असे भाजप नेते सांगतात. म्हणून पटेलांना अहंकार आलेला दिसत आहे. पक्षाचे चिन्ह असो किंवा नसो आमच्याकडे शरद पवार आहेत, या शब्दांत रोहित पवारांनी निशाणा साधला.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पूर्वीच हे स्व:घोषित निर्णय देत आहेत. याच्यातून समजून घ्यायचे की निवडणूक आयोग कदाचित भाजपचे ऐकत आहे. १९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यावर घड्याळाकडे नव्हे, तर शरद पवारांकडे जनतेने पाहिले होते. पक्षाचे चिन्ह असो किंवा नसो, आमच्याकडे शरद पवार आहेत. स्वार्थी राजकारण आम्हाला जमणार नाही, असे रोहित पवार म्हणाले. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेससुप्रिया सुळे