"ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती’’, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:59 IST2025-09-09T14:59:01+5:302025-09-09T14:59:31+5:30

Pratap Sarnaik News: ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे.पर्यावरणपुरक नव्या मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल असा विश्वास परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

"The e-vehicle revolution means creating a clean, healthy and economically prosperous Mumbai," says Transport Minister Pratap Sarnaik. | "ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती’’, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान   

"ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती’’, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान   

मुंबई - ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे.पर्यावरणपुरक नव्या मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल असा विश्वास परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

मुंबईमध्ये आज एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप सरनाईक उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले की,  राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत मुंबईसह महाराष्ट्राला हरित वाहतुकीचे केंद्र बनवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. या उपक्रमात ऑटो व टॅक्सी चालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.इलेक्ट्रिक वाहने ही केवळ पर्यावरणपूरक वाहतूक साधने नसून सार्वजनिक वाहन चालकांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे साधन आहेत. इंधन दरातील चढ-उतारांपासून मुक्ती आणि अधिक उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हे ई-वाहनां चे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.

भविष्यात स्वच्छ, निरोगी आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
 

Web Title: "The e-vehicle revolution means creating a clean, healthy and economically prosperous Mumbai," says Transport Minister Pratap Sarnaik.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.