पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 06:11 IST2025-06-02T06:11:27+5:302025-06-02T06:11:58+5:30
४ जूनपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार

पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये पहिल्या गुणवत्ता यादीचा कटऑफ अधिक राहिल्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये कटऑफमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पदवीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कटऑफ ९० टक्क्यांजवळ होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र, दुसऱ्या यादीमध्ये नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा कटऑफ काहीसा घटला आहे.
४ जूनपर्यंत प्रवेश निश्चित करा !
पारंपरिक अभ्यासक्रमांच्या कटऑफमध्ये १० ते १५ टक्क्यांची घट झाली आहे. त्याचवेळी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कटऑफमध्ये पाच टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी, हमीपत्र अर्जासह शुल्क भरून २ ते ४ जून रोजी दुपारी ३ पर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.
सेंट झेविअर्स महाविद्यालय, फोर्ट
अभ्यासक्रम दुसरी यादी पहिली यादी
बी.ए. ८९.८३ टक्के ९०.०० टक्के
बी.ए. मानसशास्त्र ९०.८३ टक्के ९३.३३ टक्के
बी. कॉम. अकाऊंट ॲण्ड फायनान्स ९१.५० टक्के ९२.१७ टक्के
बी.एससी ५०.१७ टक्के ६५.०० टक्के
बी.एससी. डेटा सायन्स आणि एआय ९१.०० टक्के ९५.०० टक्के
बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी व कम्प्युटेशनल बायोलॉजी ८९.८३ टक्के ९१.६७ टक्के
बी.ए. अर्थशास्त्र व स्टॅटिस्टिक्स ८४.५० टक्के ८९.३३ टक्के
पोदार महाविद्यालय, माटुंगा
अभ्यासक्रम दुसरी यादी पहिली यादी
बीकॅाम ९२.८३ टक्के ९४.३३ टक्के
बीकॅाम फायनान्शिअल मार्केट्स ९३.२ टक्के ९४.५ टक्के
बीएससी डाटा सायन्स अँड अनॅलिटिक्स ७४.१७ टक्के ८१.०० टक्के
बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स ९४.१७ टक्के ९५.६ टक्के
बीकॉम ऍक्च्युरिअल स्टडीज ८२.३३ टक्के ८६.८३ टक्के
रुईया महाविद्यालय, माटुंगा
अभ्यासक्रम दुसरी यादी पहिली यादी
बीए ८८ टक्के ९० टक्के
बीएससी बायोटेक्नॉलॅाजी ८८.६ टक्के ९४.६ टक्के
बीएससी कम्प्युटर सायन्स ७६ टक्के ८०.१७ टक्के
रुपारेल महाविद्यालय, माटुंगा
अभ्यासक्रम दुसरी यादी पहिली यादी
बीए ८२.१६ ट ८७.३३ टक्के
बीकॅाम ५०.०० टक्के ७७.३३ टक्के
बीएससी कम्प्युटर सायन्स ६३.१६ टक्के ७२.६६ टक्के
बीएससी आयटी (गणित) ४५ गुण (५३ गुण)
साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले
अभ्यासक्रम दुसरी यादी पहिली यादी
बीए ३५ टक्के ५९ टक्के
बीकॉम ६०.०० टक्के ७७.१७ टक्के
बीएससी ३८.०० टक्के ३८.०० टक्के
बीएससी आयटी (गणित) ५२ गुण ६२ गुण