घन:श्याम सोनार -
मुंबई : रशिया-युक्रेन युद्धाच्या ढगांमुळे निर्माण झालेली महागाई थेट मुंबईतील कष्टकरी जनतेच्या ताटापर्यंत पोहोचली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे शहरातील रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेते अडचणीत सापडले असून, चहाच्या कटिंगपासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत सर्वच पदार्थ महागले आहेत. गेल्या आठवडाभरात मोमोज, फ्रँकी आणि दाबेलीच्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.
गॅससाठी मोजावे लागतायत जादा पैसे -मुलुंड, करी रोड आणि उपनगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने छोटे विक्रेते हवालदिल झाले आहेत. मुलुंड येथील दाबेली विक्रेते दामोदर यांनी सांगितले की, ८ दिवसांपासून गॅस बुक करूनही मिळत नाही. करी रोड येथील मुकुंद घोसाळकर यांच्या मते, गॅसचा पुरवठा कमी असल्याने उत्पादनावर परिणाम झाला असून वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत.
गॅस टंचाई कायम राहिल्यास...चहा विक्रेते हरीश मेणा यांनी सांगितले की, कटिंग १० तर फुल २० रुपये कायम ठेवले; गॅसटंचाई अशीच राहिली तर २ रुपये वाढ करावी लागेल. तेलाच्या किमती वाढल्याने खाद्यपदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत चहाच्या दरात २ रुपयांची वाढ झाली आहे.
Web Summary : Russia-Ukraine war fuels Mumbai's food inflation. Gas shortages impact street vendors, raising prices for tea, vada pav, and meals. Small businesses struggle with gas cylinder availability, increasing costs for consumers.
Web Summary : रूस-यूक्रेन युद्ध से मुंबई में खाद्य पदार्थों की महंगाई बढ़ी। गैस की कमी से सड़क किनारे विक्रेताओं को नुकसान, चाय, वड़ा पाव, भोजन महंगा हुआ। छोटे व्यवसाय गैस सिलेंडर की उपलब्धता से जूझ रहे हैं।