देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतिमान होणार, सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:01 IST2024-01-22T15:59:47+5:302024-01-22T16:01:30+5:30
Ram Mandir : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्यावतीने या मंगलमय क्षणाच्या राज्यातील तमाम जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतिमान होणार, सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई - साडे पाचशे वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. आज मंगलमय वातावरणात देशातील कोट्यवधी जनतेने या मंगलमय क्षणाचे जयघोषात स्वागत केले. आज आपण प्रभू रामचंद्राच्यासमोर नतमस्तक होत असताना या देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतिमान होणार असून या भावनेतून आपण सारेजण जमलो आहोत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्यावतीने या मंगलमय क्षणाच्या राज्यातील तमाम जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्यावतीने प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त प्रदेश कार्यालयासमोर लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रभू श्री रामाच्या प्रतीमेला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पुष्पहार अर्पण केला.