Join us

Mumbai Crime: शिवडीत सव्वादोन कोटींच्या दरोड्यात तक्रारदारच ‘लुटारू’; आरोपी डिलिव्हरी बॉय म्हणून कंपनीत कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 10:00 IST

एका कंपनीकडून हॉलमार्क प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १३ ऑक्टोबर दुपारी २:३० वाजता सुमारास शामलाभाई व त्यांच्यासोबतचा कर्मचारी जगदीश केराभाई आल यांनी संबंधित दागिने एक काळ्या रंगाच्या बॅगेत भरून दुचाकीवरून कंपनीच्या फॅक्टरीकडे रवाना झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवडी परिसरात दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकात झालेल्या सव्वादोन कोटींच्या लूट प्रकरणाचा उलगडा करत चोरीचा सर्व ऐवज हस्तगत करण्यात  रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांना यश आले. गुन्ह्यातील तक्रारदार कर्मचाऱ्यानेच त्याचा सहकारी आणि त्याच्या राजस्थानमधील अन्य दोन नातेवाइकांच्या मदतीने हा कट रचून चोरी केल्याचे उघड झाले. 

आरएके मार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्यातील तक्रारदार शामलाभाई होथीभाई रबारी (३१), त्याचा सहकारी जगदीश केराभाई आल यांच्यासह सोन्याच्या दागिन्यांची लूट करून पसार झालेल्या भानाराम भगराज रबारी (२१), लीलाराम नागजी देवासी (२१), याने ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे सर्व २०६७.१४३ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  तक्रारीनुसार, सोने व्यापारी मदन कोठारी आणि त्यांचा मुलगा राज कोठारी यांची ‘मास्टरचेन अँड ज्वेल्स’ नावाने दागिने तयार करणारी कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय पायधुनी येथे आहे. तर, फॅक्टरी काळाचौकीमध्ये आहे. 

तपास कसा केला?परिमंडळ ४च्या उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली आरएके मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वेगवेगळी ८ पथके तयार करून घटनास्थळ परिसरासह येथील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.  चौकशीत शामलाभाई याने अन्य तीन साथीदारांच्या मदतीने हा लुटीचा डाव आखल्याचे स्पष्ट झाले आहे.  

पिस्तुलाने धमकावत लूटएका कंपनीकडून हॉलमार्क प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १३ ऑक्टोबर दुपारी २:३० वाजता सुमारास शामलाभाई व त्यांच्यासोबतचा कर्मचारी जगदीश केराभाई आल यांनी संबंधित दागिने एक काळ्या रंगाच्या बॅगेत भरून दुचाकीवरून कंपनीच्या फॅक्टरीकडे रवाना झाले. त्याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दुकलीने जवळील पिस्तुलाने धमकावत लूट केल्याची तक्रार त्यांनी दिली. पोलिसांनी चारही आरोपींकडे केलेल्या चौकशीत यातील तक्रारदार शामलाभाई हा कोठारी यांच्याकडे   सहा ते सात वर्षांपासून नोकरीला आहे. आर्थिक विवंचनेतून त्याने हा बनाव केला असल्याचे पोलिस तपासात अखेर उघड झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sewri Robbery: Complainant Turns Out to Be the Mastermind

Web Summary : Sewri's daylight robbery solved; complainant revealed as mastermind. Employee orchestrated the theft with accomplices. All stolen gold recovered, suspects arrested. Economic hardship cited as motive.
टॅग्स :सोनंगुन्हेगारीमुंबई पोलीस