द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 21:51 IST2026-01-08T21:45:18+5:302026-01-08T21:51:29+5:30

कुर्ला - विद्याविहार दरम्यान मक स्पेशल लोकलला आग

The Burning Train! A massive fire broke out in a local train in Mumbai; Central Railway traffic disrupted during rush hour | द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई : मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान कचरा उचलणाऱ्या लोकलला अचानक मोठी आग लागण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. परिणामी ऐन गर्दीच्यावेळे लोकलसेवा विस्कळीत झाली. 

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली आग लागलेला कचरा उचलणाऱ्या मक स्पेशल लोकलचा पहिला डबा होता, ज्यामध्ये रुळांवरून आणि रेल्वे मार्गांवरून गोळा केलेला कचरा आणि गाळ भरलेला होता.  

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागलेला हा कचरा वाहून नेणारा विशेष डबा कुर्ल्यातील ईएमयू साइडिंगवर उभा होता. आम्ही तात्काळ आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. आग विझवण्यासाठी  ओव्हरहेड केबलचा विद्युत पुरवठा खंडित करावा लागला होता. विद्याविहार आणि सायन रेल्वे स्टेशन दरम्यान रात्री ८.३८ ते ८:५५ या वेळेत हा पुरवठा खंडित झाल्याने अप धिम्या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. परिणामी कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे हाल झाले. दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे ते म्हणाले.

Web Title : मुंबई लोकल ट्रेन में आग, मध्य रेलवे सेवा बाधित

Web Summary : गुरुवार रात कुर्ला और विद्याविहार स्टेशनों के बीच कचरा ले जा रही लोकल ट्रेन में भीषण आग लग गई, जिससे मध्य रेलवे सेवा बाधित हो गई। पहली बोगी में आग लगने से बिजली काटी गई और धीमी लाइन का यातायात रुक गया, जिससे यात्रियों को परेशानी हुई। कारण अज्ञात है।

Web Title : Mumbai Local Train Catches Fire, Disrupting Central Railway Services

Web Summary : A major fire erupted in a garbage-carrying local train between Kurla and Vidyavihar stations Thursday night, disrupting Central Railway services during rush hour. The fire, which started in the first compartment, led to power cuts and halted up slow line traffic, causing inconvenience for commuters. The cause is still unknown.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.