वरळी सी-लिंकवरून उडी घेणाऱ्याचा मृतदेह सापडला, तीन महिन्यांपूर्वीच व्यक्त केला होता इरादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:45 IST2023-08-02T15:44:31+5:302023-08-02T15:45:30+5:30
दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे त्यांनी यापूर्वीच जीवन संपविण्याचा इरादा वक्त केला होता. त्यांनी तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविण्यात आहे.

वरळी सी-लिंकवरून उडी घेणाऱ्याचा मृतदेह सापडला, तीन महिन्यांपूर्वीच व्यक्त केला होता इरादा
मुंबई : वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी घेतलेल्या टिकम लक्ष्मणदास मकिजा (५६) यांचा दुपारी दीडच्या सुमारास दादर चौपाटी भागात मृतदेह तरंगताना दिसून आला. हेलिकॉप्टरच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे त्यांनी यापूर्वीच जीवन संपविण्याचा इरादा वक्त केला होता. त्यांनी तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविण्यात आहे.
खार परिसरात राहणारे टिकम हे सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गाडीने सी लिंकवर येऊन थांबले तेथील सुरक्षारक्षक पुढे येईपर्यंत समुद्रात उडी घेतली. पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले. नौसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.
बचाव पथकाकडून रात्री उशिरापर्यंत सर्च ऑपरेशन झाले.त्यापाठोपाठ मंगळवारी सकाळपासून नौसेनेच्या पथकाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुन्हा सर्च सुरू केले. अखेर दुपारच्या सुमारास दादर चौपाटी भागात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानुसार, हेलिकॉप्टरच्या मदतीने तो बाहेर काढला. या घटनेने टिकम यांच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.