गोवंडीत मुंबई पब्लिक स्कूलची घंटा लवकरच वाजणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:41 IST2025-10-11T10:40:50+5:302025-10-11T10:41:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोवंडीतील नटवर पारेख कंपाउंडमधील पालिकेची पब्लिक स्कूल अद्याप सुरू न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी ...

गोवंडीत मुंबई पब्लिक स्कूलची घंटा लवकरच वाजणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोवंडीतील नटवर पारेख कंपाउंडमधील पालिकेची पब्लिक स्कूल अद्याप सुरू न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. मात्र, आता दिवाळीनंतर शाळा सुरू होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
नटवर पारेख कंपाउंड परिसरात एमएमआरडीएने तीन वर्षांपूर्वी शाळेची इमारत उभारली होती. ही इमारत अलीकडेच मुंबई पालिकेकडे हस्तांतरित झाली. मात्र, शाळेच्या इमारतीभोवती रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना सहज ये-जा करता येईल, असा रस्ता नसल्याने वर्ग सुरू करण्यात अडथळे येत होते.
शाळेची पाहणी
या पार्श्वभूमीवर खासदार संजय पाटील यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची भेट घेऊन शाळा सुरू करण्याबाबत पत्र दिले.
त्यानंतर पालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली आणि रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.
वन विभागाशी संबंधित शंका दूर
नटवर पारेख कंपाउंडमधील पब्लिक स्कूल आता लवकर सुरू होणार आहे. या शाळेला नुकतीच ओसी मिळाली आहे.
मात्र रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्यांना सहज ये-जा करता यावी, यासाठी रस्ता तयार करणे आवश्यक होते.
त्या कामाला आता गती मिळाली आहे. वन विभागाशी संबंधित काही अडचणीही दूर झाल्या आहेत. त्यामुळे शाळेशी संबंधित
समस्या लवकरच सुटतील, असे पाटील यांनी सांगितले.