Join us  

राज ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच; राज्यात हुकुमशाही आहे का?, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 8:43 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्या घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दलही दिलीप वळसे-पाटलांनी भाष्य केलं आहे.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही घटना घडत आहेत. परंतु, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित आहे. राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, राज्यात महाराष्ट्र पोलिसांकडून योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली जात असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. 

राज्यात मुलभूत प्रश्नांबाबत आंदोलन न करता इतर विषय घेवून आंदोलनं केली जात असून, राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात असल्याचे ते म्हणाले. राज्यात मुलभूत प्रश्नांबाबत आंदोलन न करता इतर विषय घेवून आंदोलनं केली जात असल्याचं देखील दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितलं. 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्या घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दलही दिलीप वळसे-पाटलांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरेंवर १ मे रोजी झालेल्या औरंगाबादमधील सभेनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, राज ठाकरेंवर औरंगाबाद पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. कोणीही येणार आणि भोंगे काढायला सांगणार, राज्यात हुकुमशाही आहे का?, असा सवालही दिलीप वळसे-पाटलांनी उपस्थित केला.

कोणाही धमकी द्यायची आणि सरकारने सहन कारायचे, हे महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा देखील दिलीप वळसे-पाटलांनी राज ठाकरेंना दिला आहे. प्रत्येकाने काद्याचा आदर करावा. राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे सरकारला त्यावर काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. शिवाय भोंग्यांबाबत केंद्रानेच धोरण ठरवलं पाहिजे, असेही दिलीप पळसे पाटील यांनी म्हटले आहे.  

राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला, हे पटवून देऊ- 

हनुमान चालिसा पठनावरून अटक करण्यात आलेल्या राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला यावर बोलताना ते म्हणाले की, राणांवर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला, हे वरील कोर्टात पटवून देऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राजद्रोहाचं कलमच राहिले नाही तर त्याचा कुणी गैरवापर करणार नाही. त्यामुळे राजद्रोहाच्या कलमाबाबत केंद्रानेच गाईडलाईन ठरवणं गरजेचं असल्याचे दिलीप वळसे-पाटलांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :राज ठाकरेदिलीप वळसे पाटीलपोलिसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार