८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला विधानभवनात आजपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 04:13 PM2024-01-27T16:13:18+5:302024-01-27T16:14:34+5:30

या परिषदेकरिता भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष मा. श्री. ओम बिर्ला व राज्यसभा उपसभापती मा. श्री. हरिवंश यांचे आगमन झाले.

The 84th All India Presiding Officer Conference will begin today at the Vidhan Bhavan | ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला विधानभवनात आजपासून सुरुवात

८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला विधानभवनात आजपासून सुरुवात

मुंबई दि.२७: विधानभवनात आजपासून तीन दिवसीय ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष मा. श्री. ओम बिर्ला व राज्यसभा उपसभापती मा. श्री. हरिवंश यांचे आगमन झाले.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यसभा उपसभापती मा. श्री. हरिवंश यांचे व विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी लोकसभेचे अध्यक्ष मा. श्री. ओम बिर्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

भारतातील राज्य विधीमंडळ सचिवालयांच्या सचिवांची ६०वी परिषद विधानभवन मुंबई येथे दिनांक २७,२८ व २९ जानेवारी २०२४ आयोजित करण्यात आली आहे. 

Web Title: The 84th All India Presiding Officer Conference will begin today at the Vidhan Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.