Join us

'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:30 IST

Anil Parab : आमदार अनिल परब यांनी आज सभागृहात राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले.

Anil Parab : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. दरम्यान,आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. मुंबईतील डान्सबारचा मुद्दा उपस्थित करत परब यांनी मंत्री कदम यांच्यावर आरोप केले. काही दिवसापूर्वी मुंबईतील 'सावली डान्सबार' राज्यमंत्री कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे असल्याचा आरोप केला. 

"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

मुंबईमध्ये डान्सबारवर बंदी असतानाही हा डान्सबार चालू कसा आहे? तसेच पोलिसांनी काही दिवसापूर्वी धाड टाकून २२ बारबाला ताब्यात घेतल्याचे परब यांनी सांगितले. सभागृहात बोलताना अनिल परब म्हणाले,सावली बारचे परमीट जे आहे ते ज्योती रामदास कदम यांच्या नावावर आहे. माझ्या माहिती प्रमाणे त्या गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत. त्या खात्याशी संबंधीत असलेला व्यवहार करु शकतो का? ज्या आर आर आबांनी डान्सबार बंद केला.  अशाच गोष्टी चालवण्याचे काम गृहराज्यमंत्र्याच्या घरीच होतंय. समतानगर पोलिस ठाणे आणि युनिट नंबर १२ यांनी रेड केली. त्यांना डान्सबारची माहिती मिळाली होती, असा गंभीर आरोप आमदार अनिल परब यांनी केला.

बारवर अश्लील हावभाव केले जायचे 

"या बारवर वेगवेगळी लोक येऊन त्या मुलींसोबत अश्लील हावभाव करतात. कायद्यात ज्या तरतुदी आहेत. डान्सबारला परमिशन नाही. डान्सबारचा विषयच नाही, ऑर्केस्ट्राला परमिशन आहे. ऑर्केस्ट्राचे नियम आहे. यामध्ये याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे, त्यामधून मुली खाली आल्या नाही पाहिजेत. लोकांच्यात आणि त्यांच्यात अंतर पाहिजे. पण, पोलिसांना या बारची वेगळीच माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांनी रेड केली. यामधून २२ डान्सबार बाला पकडल्या गेल्या. २२ गिऱ्हाईक, चार ऑफिसस्टाफ अशा लोकांना पकडले. लगेच सूत्र हलली. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा लिहिला आहे. पोलिसांनी रेकॉर्डिंगही करुन गुन्हा दाखल केला. 

"आम्ही ती एफआयआरची कॉपी काढली. त्यानंतर या बारच परमिट कोणाच्या नावावर आहे लक्षात आले. त्या स्टेटमेंटमध्ये हे परमिट ज्याती रामदास कदम यांच्या नावावर असल्याचे लिहिले आहे. ज्योती कदम या राज्यगृहमंत्र्यांच्या आई आहेत. संबंधित खात्याचे मंत्री तो व्यवसाय करु शकतात का? असा सवालही आमदार परब यांनी केला.

टॅग्स :योगेश कदमअनिल परब