‘आयआयटी मुंबई न केल्याने देवाचे आभार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 08:49 IST2025-11-25T08:49:02+5:302025-11-25T08:49:19+5:30
IIT Mumbai: आयआयटी बॉम्बेचे आयआयटी मुंबई केले नाही, यासाठी देवाचे आभार आहेत, असे वक्तव्य केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. आयआयटी मद्राससाठीही हे लागू असून, ते अद्यापही आयआयटी मद्रास आहे, अशीही जोड त्यांनी दिली.

‘आयआयटी मुंबई न केल्याने देवाचे आभार’
मुंबई - आयआयटी बॉम्बेचे आयआयटी मुंबई केले नाही, यासाठी देवाचे आभार आहेत, असे वक्तव्य केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. आयआयटी मद्राससाठीही हे लागू असून, ते अद्यापही आयआयटी मद्रास आहे, अशीही जोड त्यांनी दिली.
राष्ट्रीय क्वाण्टम मोहिमेंतर्गत ‘फॅब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटीज’चे उद्घाटन व देशातील पहिली लिक्विड हिलियम क्रायोजेनिक सुविधेचे लोकार्पण मंत्री सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. १०० इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये क्वाण्टम तंत्रज्ञानाच्या अभ्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात येतील. त्यासाठी प्रत्येक कॉलेजला एक कोटींचा निधी मिेळेल, असे माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. अभय करंदीकर यांनी दिली.
चार हब निर्माण करणार
देशातील आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई आणि आयआयएससी या शिक्षण संस्थांमध्ये क्वाण्टम तंत्रज्ञानातील भविष्यकालीन संशोधन सुरू आहे.
त्यासाठी चार हब निर्माण करण्यात आल्याचे डॉ. करंदीकर यांनी सांगितले. तर आयआयटी मुंबईने निर्माण केलेली हेलियम प्रयोगशाळेची सुविधा संपूर्ण देशातील विद्यापीठे, संशोधन संस्था यांच्यासाठी खुली झाल्याचे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. डॉ. शिरीष केदारे यांनी सांगितले.