Join us

Mumbai Metro: मोघरपाड्यात चार मेट्रो मार्गिकांसाठी कारशेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:48 IST

Mumbai Metro News: वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न सुटला आहे.

मुंबई : वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न सुटला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे १७४.०१ हेक्टर जमीन मिळाली आहे. या जागेवर एकात्मिक मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो ४, ४ अ यांच्यासह मेट्रो १० आणि मेट्रो ११ या मार्गिकांसाठी मिळून ५६ किमी मेट्रो मार्गाचे संचालन येथून होणार आहे.

वडाळा ते कासारवडवली या ३२.३२ किमी आणि मेट्रो ४ अ या २.७ किमीच्या मार्गिकांचे काम सुरू आहे. या दोन्ही मार्गिकांवर मिळून ३२ स्थानके असतील. मेट्रो ४ आणि मेट्रो ६साठी कांजूरमार्ग येथे एकत्रित कारशेड उभारण्यात येणार होती. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी मिळू शकली नाही. परिणामी, ही कारशेड मोघरपाडा येथे हलविण्यात आली. एमएमआरडीएने यापूर्वीच या कारशेडसाठी ९०५ कोटी रुपयांचे कंत्राट मे. एसईडब्ल्यू-व्हीएसई जॉइंट व्हेंचरला दिले आहे. आता ही जागा कंत्राटदाराच्या ताब्यात देण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी मिळू शकली नाही. परिणामी, ही कारशेड मोघरपाडा येथे हलविण्यात आली. एमएमआरडीएने यापूर्वीच या कारशेडसाठी ९०५ कोटी रुपयांचे कंत्राट मे. एसईडब्ल्यू-व्हीएसई जॉइंट व्हेंचरला दिले आहे. आता ही जागा कंत्राटदाराच्या ताब्यात देण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बाधित शेतकऱ्यांना विकसित भूखंडमोघरपाडा येथील कारशेडमुळे १६७ शेतकरी बाधित होत आहेत. त्यातील भाडेतत्त्वावर जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना २२.५ टक्के विकसित भूखंड, तर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना १२.५ टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या जमिनीचे भूसंपादन करून ती एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे.

मेट्रो डेपोमधील महत्त्वाच्या सुविधा - मोठ्या देखभालीसाठी १० वर्कशॉप ट्रॅक- तपासणीसाठी १० निरीक्षण ट्रॅक- रात्री गाड्या उभ्या करण्यासाठी ६४ स्टेबलिंग ट्रॅक- चाकांचे प्रोफाइलिंग करण्यासाठी अंडर-फ्लोअर व्हील लेथ- आवश्यक डेपो कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधा

टॅग्स :मेट्रोमुंबईमहाराष्ट्रठाणे