'ठाकरे सरकारने महापुरुषांच्या यादीतून संत नामदेव महाराजांचे नाव वगळले'

By महेश गलांडे | Published: February 23, 2021 04:21 PM2021-02-23T16:21:34+5:302021-02-23T16:22:28+5:30

यंदाच्या यांदीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं नाव नसल्याने नामदेव महाराजांच्या अनुयायांनी नाराजी वर्तवली आहे.  

'Thackeray government removes Sant Namdev Maharaj's name from list of great men', chandrakant patil | 'ठाकरे सरकारने महापुरुषांच्या यादीतून संत नामदेव महाराजांचे नाव वगळले'

'ठाकरे सरकारने महापुरुषांच्या यादीतून संत नामदेव महाराजांचे नाव वगळले'

Next
ठळक मुद्देठाकरे सरकारने थोर महापुरुष संतांच्या यादीतून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव वगळले आहे. यासंदर्भात आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगरच्या शिष्टमंडळाने मला निवेदन दिले.

मुंबई - राज्य सरकारकडून दरवर्षी राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठीची यादी जाहीर केली जाते. यंदाही राज्य सरकारने थोर व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री असलेल्या सामान्य प्रशासन खात्याने याबाबतचा निर्णय घेतला आहे. मात्र, यंदाच्या यांदीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं नाव नसल्याने नामदेव महाराजांच्या अनुयायांनी नाराजी वर्तवली आहे.

ठाकरे सरकारने थोर महापुरुष संतांच्या यादीतून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव वगळले आहे. यासंदर्भात आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगरच्या शिष्टमंडळाने मला निवेदन दिले. आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात हा विषय लावून धरू, असे यावेळी सर्वांना मी आश्वास्त केले, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.  

राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, 16 फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, 17 सप्टेंबरला केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे आणि 27 डिसेंबरला डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने दिलेली थोर व्यक्तींची‌ यादी 

सावित्रीबाई फुले जयंती – 3 जानेवारी 2021
जिजाऊ माँ साहेब जयंती – 12 जानेवारी 2021
स्वामी विवेकानंद जयंती – 12 जानेवारी 2021
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती – 23 जानेवारी 2021
बाळासाहेब ठाकरे जयंती – 23 जानेवारी 2021
संत सेवालाल महाराज जयंती – 15 फेब्रुवारी 2021
बाळशास्त्री जांभेकर – 16 फेब्रुवारी 2021
छत्रपती शिवाजी महाराज जयंती – 19 फेब्रुवारी 2021
संत गाडगेबाबा महाराज जयंती – 23 फेब्रुवारी 2021
संत रविदास महाराज जयंती (तिथीनुसार) – 27 फेब्रुवारी 2021
यशवंतराव चव्हाण जयंती – 12 मार्च 2021
शहीद दिन – 23 मार्च 2021
महात्मा ज्योतिबा फुले जयंती – 11 एप्रिल 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2021
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती – 30 एप्रिल 2021
महात्मा बसवेश्वर जयंती – 14 मे 2021
दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस – 21 मे 2021
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती – 28 मे 2021
अहिल्यादेवी होळकर जयंती – 31 मे 2021
महाराणा प्रतापसिंह जयंती (तिथीनुसार)- 13 जून 2021
राजर्षी शाहू महाराज जयंती – 26 जून 2021
वसंतराव नाईक जयंती – 1 जुलै 2021
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती – 23 जुलै 2021
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती – 1 ऑगस्ट 2021
क्रांतिसिंह नाना पाटील जयंती – 3 ऑगस्ट 2021
सद्भावना दिवस – 20 ऑगस्ट 2021
राजे उमाजी नाईक जयंती – 7 सप्टेंबर 2021
केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे – 17 सप्टेंबर 2021
 

Web Title: 'Thackeray government removes Sant Namdev Maharaj's name from list of great men', chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.