कोरोना चाचणीच्या मशीन अडकल्या निविदा प्रक्रियेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 07:36 PM2020-04-05T19:36:32+5:302020-04-05T19:37:00+5:30

माहिती अधिकारातून स्पष्ट : मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची मागणी

The tender process of corona test machines is stuck | कोरोना चाचणीच्या मशीन अडकल्या निविदा प्रक्रियेत

कोरोना चाचणीच्या मशीन अडकल्या निविदा प्रक्रियेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई – जगासह देशभरात कोरोना संक्रमण झालेल्या नागरिकांची संख्या वाढत असून राज्यात सुद्धा परिस्थिती बिकट होत चालली आहे. अश्या वेळी कोरोनाची चाचणी घेत तत्काळ म्हणजे ४५ मिनिटांत परिणाम देणारी स्वयंचलित आरएनए शुद्धीकरण प्रणाली ( Automated RNA Purification System) मशीन ही निविदा प्रक्रियेत अडकली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ लक्ष देण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

याविषयी, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात राज्यात अशा १० स्वयंचलित आरएनए शुद्धीकरण प्रणाली ( Automated RNA Purification System) मशीन खरेदी करण्यासाठी हाफकिन जीव- औषध निर्माण महामंडळ ( मर्यादित) तर्फे १४ मार्च २०२० रोजी ई- निविदा जारी केल्या होत्या ज्याचा निर्णय २७ मार्च २०२० रोजी घेण्यात येणार होता. यासाठी १५ लाख एका मशीनसाठी अंदाज खर्च आहे आणि राज्याला अशा दहा मशीनची आवश्यकता आहे.

एकावेळी २४ नागरिकांच्या चाचणी करण्याची क्षमता असलेल्या मशीन ४५ मिनिटांत अहवाल देण्यात सक्षम आहे. आज अहवाल तत्काळ न मिळाल्याने २ ते ३ दिवस संपूर्ण यंत्रणा ताटकळत रहाते आणि पॉजिटीव्ह असल्याची माहितीचा अहवाल वेळेत प्राप्त न झाल्यामुळे ताणही वाढतो. वैद्यकीय संचालनालय तर्फे तत्काळ निधी हाफकिनकडे वळविण्यात येणे आवश्यक असताना मंत्रालयातील अधिका-यांच्या लालफिताशाही म्हणो किंवा आणखी काही, निर्णय घेण्यास वेळखाऊ धोरण अवलंबिले जात आहे, असा आरोप गलगली यांचा आहे. किचकट प्रक्रिया आणि प्रतिक्षेत असलेल्या निविदा तत्काळ उघडत निर्णय घ्यावा जेणेकरुन या सर्व १० स्वयंचलित आरएनए शुद्धीकरण प्रणाली ( Automated RNA Purification System) मशीनचा फायदा राज्यास होऊ शकतो, अशी मागणी सरतेशेवटी गलगली यांनी केली आहे.

Web Title: The tender process of corona test machines is stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.