Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 09:04 IST2025-06-21T09:02:42+5:302025-06-21T09:04:52+5:30

तेजस्वी घोसाळकर नाराज असल्याची  चर्चा असताना त्यांची  भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेवर संचालक म्हणून  वर्णी लावण्यात आली

Tejasvee Ghosalkar: Tejasvee Ghosalkar as Director of Mumbai Bank | Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी

Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्धवसेनेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकारी आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांची स्नुषा तेजस्वी घोसाळकर नाराज असल्याची  चर्चा असताना त्यांची  भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेवर संचालक म्हणून  वर्णी लावण्यात आली आहे.  भाजपने या माध्यमातून तेजस्वी घोसाळकर यांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर हे मुंबै बँकेवर संचालक म्हणून निवडून आले होते. मात्र, गेल्यावर्षी त्यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या निधनाने मुंबै बँकेतील संचालकाचे पद रिक्त झाले होते. रिक्त जागी अन्य सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो. या पार्श्वभूमीवर  गुरुवारी झालेल्या मुंबै बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेजस्वी घोसाळकर यांची रिक्त जागी नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व संचालक मंडळाने  ही नियुक्ती करण्याचा निर्णय  एकमताने घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष तथा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी  दिली.

Web Title: Tejasvee Ghosalkar: Tejasvee Ghosalkar as Director of Mumbai Bank