Ghatkopar Versova Metro Delay: मुंबईमेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने घाटकोपर-वर्सोवादरम्यान मेट्रो सेवा ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल मेट्रो प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून मेट्रोतील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याची त्यांनी दिली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला पोहोचण्यास उशीर होणार असल्याने प्रवाशी वैतागले आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरील मेट्रो सेवा विस्कळीत झाल्याने घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. यावर मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरण दिले. "घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या एका मेट्रोत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे संबंधित मेट्रो नियोजित वेळेपेक्षा उशीराने धावत होती. परिणामी, इतर गाड्यांना उशीर झाला. या मेट्रोला सेवेतून हटवण्यात आले आहे."