आज मुंबई आयआयटीत रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 07:30 IST2025-12-22T07:30:10+5:302025-12-22T07:30:20+5:30
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे उद्घाटनपर बीजभाषण होणार आहे.

आज मुंबई आयआयटीत रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तंत्रज्ञानातील अद्भूत आविष्कार, नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जाणारा आशियातील सर्वांत मोठा विज्ञान महोत्सव म्हणून ओळख असलेल्या आयआयटी, मुंबईचा ‘टेकफेस्ट’ २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ‘अ सिम्युलेटेड पॅराडाइम’ या संकल्पनेवर आधारित हा २९वा टेकफेस्ट असून, २४ डिसेंबरपर्यंत पवईच्या आयआयटी कॅम्पसमध्ये तंत्रज्ञानाचा हा उत्सव रंगणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे उद्घाटनपर बीजभाषण होणार आहे. याशिवाय, पहिल्याच दिवशी इन्फोसिसचे एन. आर. नारायण मूर्ती, नेपाळचे माजी पंतप्रधान डॉ. बाबुराम भट्टराई आणि भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान आदी नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.
देशाच्या सामर्थ्याचे
दर्शन: डिफेन्स एक्स्पो
संरक्षण क्षेत्रातील भारताची प्रगती दर्शवण्यासाठी विशेष डिफेन्स एक्स्पोचे आयोजन केले आहे. यात आकाश क्षेपणास्त्रासह डीआरडीओच्या विविध संशोधनाचे प्रदर्शन के. व्ही. ग्राउंडवर पाहता येईल. यासोबतच डिफेन्स सिम्पोजियममध्ये माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, माजी नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार आणि माजी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी
संवाद साधतील.