मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 07:45 PM2024-07-04T19:45:48+5:302024-07-04T19:46:14+5:30

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्हवर हजारो चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे.

Team India Victory Parade: Salute to Mumbaikars; Ambulance stuck in thousands of fans, immediately cleared the way | मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...

मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...

Team India Victory Parade :  विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईतील मरीन ड्राईव्हवर विजयी परेड निघाली. आपल्या टीमच्या स्वागतासाठी या मार्गावर हजारोंच्या संख्यने चाहते जमले. अशा तुफान गर्दीतही मुंबईकरांनी माणुसकी जपली अन् या मार्गाने रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला तात्काळ जागा करुन दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, मुंबईकचांच्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलिस कर्मचारी आणि निरीक्षक स्तरावरील अधिकारीही सज्ज आहेत. दरम्यान, चाहत्यांची वाढती संख्या पाहता मुंबई पोलिसांनी लोकांना मरिन ड्राइव्हवर न येण्याचे आवाहन केले आहे. तर, ही गर्दी पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी संवाद साधला अन् गर्दींचे संनियत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत.

चार खेळाडूंचा विधानभवनात सन्मान
विश्वविजेत्या संघात मुंबईतील चार खेळाडूंचा समावेश होता. या चौघांचा शुक्रवारी महाराष्ट्र विधान भवन संकुलात सन्मान करण्यात येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी सभागृहात ही माहिती दिली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा समावेश आहे. हे सर्वजण मुंबईचे रहिवासी आहेत.सकाळी बार्बाडोसहून नवी दिल्लीला परतला, जिथे त्याचे भव्य स्वागत करण्यात आले.

 

Web Title: Team India Victory Parade: Salute to Mumbaikars; Ambulance stuck in thousands of fans, immediately cleared the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.