Join us
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच शिक्षकांचे पगार- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 15:19 IST

कोणत्याही शिक्षकाचे नुकसान होणार नाही.

मुंबई: शिक्षकांच्या पगारासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पालन करण्यास राज्य सरकार बांधील आहे. न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत उपलब्ध झाल्यानंतर विधी व न्याय खात्याच्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु शिक्षकांची पूर्वीच्या बँकेतील खाती नवीन खात्यामध्ये बदलण्याची प्रक्रिया सुरु असून त्यासाठी थोडा वेळ लागत आहे. पण कपिल पाटील यांचाच हट्ट आहे की, आताच युनियन बँकेतून पगार काढा. त्यामुळे केवळ राजकीय भांडणासाठी हेच शिक्षकांचा छळ करत आहेत. दुसरीकडे माझ्यावर आरोप करत आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

शिक्षकांचे पगार होणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही शिक्षकाचे नुकसान होणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होईल, याची काळजी सरकार घेईल असे तावडे यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या हिताला प्राधान्य देण्याचीच राज्य सरकारची भूमिका आहे. पण काही जण फक्त निवडणुका जवळ आल्यामुळे ही राजकीय नौटंकी करीत असून काहीतरी खोटेनाटे पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.  

टॅग्स :शिक्षकमहाराष्ट्र