पाचशे फुटांच्या करमाफीचे लक्ष्य; नव्या महापौरांचा अजेंडा ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 01:04 AM2019-11-23T01:04:06+5:302019-11-23T06:20:41+5:30

सांडपाणी पुनर्वापर योजना, खड्डेमुक्त रस्ते, मुंबईकरांना माफक दरात औषधे

A target of five hundred feet of karma; The mayor's agenda was set | पाचशे फुटांच्या करमाफीचे लक्ष्य; नव्या महापौरांचा अजेंडा ठरला

पाचशे फुटांच्या करमाफीचे लक्ष्य; नव्या महापौरांचा अजेंडा ठरला

googlenewsNext

मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाचशे चौरस फुटांच्या मालमत्तांना करमाफी देण्याचा शासन दरबारी रेंगाळलेला प्रस्ताव अमलात आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या निर्णयाच्या परिपूर्ततेसाठी त्या पाठपुरावा करणार आहेत.

शिवसेनेने लोकसभा निवडणुकीपूर्वी पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी आणि ५०० ते ७०० फुटांपर्यंतच्या घरांना करामध्ये सवलत देण्याची घोषणा आपल्या जाहीरनाम्यातून केली होती. याबाबतची ठरावाची सूचना पालिकेच्या महासभेत मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्यात आली होती. मात्र भाजप सरकारने शिवसेनेची कोंडी सुरू केली. याबाबतची मागणी मंजूर झाल्यानंतरही त्यावर अद्याप अंमल झालेला नाही.

त्यामुळे करदात्या मुंबईकरांना करमाफीची सवलत मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. तसेच, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी पुनर्वापर योजना, खड्डेमुक्त रस्ते, मुंबईकरांना माफक दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी जैविक औषधाचे धोरण तयार करावे, आदी सूचना त्यांनी आपल्या भाषणातून प्रशासनाला केल्या.

महापौरांचा अजेंडा
पाण्याची मागणी वाढतच असल्याने गारगाई पिंजाळ व दमण गंगा - पिंजाळ नदी जोड प्रकल्पाद्वारे पाण्याचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार.
पाणी बचत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी पुनर्वापर योजना प्रभावीपणे राबविणार.
काळाची गरज असलेल्या अवयवदानासाठी जनजागृती करणार.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, सर्रास होणाऱ्या प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न.
महापौर निधीमध्ये भरीव वाढ करण्यासाठी सर्व नागरिक, दानशूर व्यक्ती, सभागृहातील सदस्य आणि कर्मचारी संघटनांना पुढाकार घेण्याचे आवाहन.
पाळीव प्राण्यांना काही आजार झाल्यास त्यांना उपचार मिळावेत यासाठी पशू आरोग्य सेवा केंद्र सुरू करणार.

Web Title: A target of five hundred feet of karma; The mayor's agenda was set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.