‘महाडच्या चवदार तळ्याचे पाणी घेऊन जा आणि गावोगावी समतेचा संदेश पोहोचवा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:08 IST2026-03-20T17:07:18+5:302026-03-20T17:08:32+5:30

Harshvardhan Sapkal News: महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे 'समतेचे अमृत' असून या चवदार तळ्याचे पाणी घेऊन गावा-गावतील तलाव, नदी , धरणात सोडून 'समतेचा संदेश' सर्वदूर पोहचवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

'Take the water from the delicious lake of Mahad and spread the message of equality to the villages', appeals Harshvardhan Sapkal | ‘महाडच्या चवदार तळ्याचे पाणी घेऊन जा आणि गावोगावी समतेचा संदेश पोहोचवा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन 

‘महाडच्या चवदार तळ्याचे पाणी घेऊन जा आणि गावोगावी समतेचा संदेश पोहोचवा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन 

मुंबई/महाड -  मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत  समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश दिला. महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे 'समतेचे अमृत' असून या चवदार तळ्याचे पाणी घेऊन गावा-गावतील तलाव, नदी , धरणात सोडून 'समतेचा संदेश' सर्वदूर पोहचवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

महाडमध्ये 'चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष' सोहळ्याचा शुभारंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महात्मा गांधी यांचे पणतु, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उल्का महाजन, गांधीवादी नेते जयंत दिवाण, काँग्रेसच्या एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येना उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सभागृहापासून चवदार तळ्यापर्यंत पदयात्रा करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व चवदार तळ्यातील पाणी कलशात भरून काँग्रेस पदाधिका-यांना दिले. हे पाणी सर्व जिल्ह्यांमध्ये गावागावात जाऊन नदी, तलाव व धरणातही सोडले जाणार आहे.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे यासाठी महाडचा सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अप्रिय घटनांचा सामना करावा लागला पण त्यांनी कशाचीही पर्वा न करता हा सत्याग्रह केला. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशावेळीही बाबासाहेब यांना अशाच अप्रिय घटनांचा सामना करावा लागला होता. महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांतीत छत्रपती  शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी यांचा विचार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर मनुवादी प्रवृत्तींनी या चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले होते, त्याच विचाराचा वारसा महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, आजही या मनुवादी विचाराचा सामना आपल्याला करावा लागत आहे, आजही हा विचार अनेक व्यवस्थेपासून बहुजन समाजाला वंचित ठेवत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title : महाड का पानी ले जाएं, समानता का संदेश फैलाएं: हर्षवर्धन सपकाल

Web Summary : हर्षवर्धन सपकाल ने महाड के चवदार तालाब से पानी ले जाकर समानता का संदेश हर गांव तक पहुंचाने का आग्रह किया। यह डॉ. अम्बेडकर के संघर्ष से प्राप्त समानता का प्रतीक है। कार्यक्रम चवदार तालाब सत्याग्रह की शताब्दी पर समानता और सामाजिक न्याय पर जोर देता है।

Web Title : Carry Mahad water, spread equality message: Harshvardhan Sapkal appeals.

Web Summary : Harshvardhan Sapkal urged people to carry water from Mahad's Chavdar Tale, a symbol of equality achieved through Dr. Ambedkar's struggle, and spread its message to every village. The event commemorated the centenary of the Chavdar Tale Satyagraha, emphasizing equality and social justice.