कचरा व्यवस्थापन व रस्ते नियोजनाकडे लक्ष द्या - लक्ष्मीकांत देशपांडे, पर्यावरण अभ्यासक 

By अोंकार करंबेळकर | Published: August 30, 2017 02:40 PM2017-08-30T14:40:19+5:302017-08-30T14:41:42+5:30

काल मुंबईत २००५ पेक्षा कमी पाऊस झाला असला तरी शहराचे कचरा व्यवस्थापन आणि रस्त्यांच्या नियोजनातील चुका पुन्हा अधोरेखित झाल्या

Take care of waste management and road planning - Laxmikant Deshpande, environmental practitioner | कचरा व्यवस्थापन व रस्ते नियोजनाकडे लक्ष द्या - लक्ष्मीकांत देशपांडे, पर्यावरण अभ्यासक 

कचरा व्यवस्थापन व रस्ते नियोजनाकडे लक्ष द्या - लक्ष्मीकांत देशपांडे, पर्यावरण अभ्यासक 

googlenewsNext

मुंबई, दि. 30 - काल मुंबईत २००५ पेक्षा कमी पाऊस झाला असला तरी शहराचे कचरा व्यवस्थापन आणि रस्त्यांच्या नियोजनातील चुका पुन्हा अधोरेखित झाल्या. कचर्याची विल्हेवाट लोकांनी योग्य मार्गाने लावणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात त्यावर लक्ष ठेवण्याचो काम प्रशासनाचे आहे. कचरा व्यवस्थापन कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. 

जेव्हा घरे बांधली जातात तेव्हा भूजलाच्या मार्गात खणलेल्या पायामुळे अडथळे आणले जातात. त्यामुळे पाया खणताना त्या पाण्याच्या मार्गात अडथळे आणले जाऊ नयेत. घराची परवानगी देताना जसा जमिनीच्या वरच्या बांधकामाचा विचार होतो तसा जमिनीखालच्या कामाचाही विचार केला पाहिजे. 

रस्ते बांधताना आपल्याकडे नैसर्गिक उताराचा विचार केला जात नाही त्यामुळेच पाणी साचण्याचे प्रकार होतात, रस्त्याच्या कडेला असणार्या ड्रेनेजची रुंदी किती आहे ? के किती पाणी सामावून घेऊ शकते याचा विचार करायला हवा तरच त्यावर उत्तर शोधता येईल. ड्रेनेजचे पाणी मुख्य ड्रेनेजमध्ये जाते त्या व्यवस्थेची रचना, तपासणी, सफाई यावर सतत लक्ष असायला हवे, जसे नालेसफाईचे वेळापत्रक असते तसे त्याचेही वेळापत्रक हवे. ही सफाई पावसाळ्यापुर्वी व वारंवार नियमित व्हायला हवी.

भरती ओहोटीचे वेळापत्रक पालिकेने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वेगाने प्रसारित करायला हवे, हे दिवस महत्त्वाची कामे टाळा, घराबाहेर शक्यतो पडू नका असे संदेश फार आधी योशल मीडियावर द्यायला हवेत. त्यामुळे मोठी अडचण टाळता येईल. ही वेळापत्रके पालिकेकडे फार आधीपासून आलेली असतात त्यामुळे त्यादिवशी जलनिचरा आणि वाहतूक यांचेही नियोजन व्हावे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरात किती पाऊस पडतो, किती पाणी निचरा होऊ शकते, किती पाऊस शोषला जाऊ शकचो याचा अभ्यास करुन त्याची आकडेवारी प्रसिद्ध व्हायला हवी. म्हणजे त्याहून जास्त पाऊस पडला तर काय करायचे याचा विचार करणे सोपे जाईल.

Web Title: Take care of waste management and road planning - Laxmikant Deshpande, environmental practitioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.