‘कलर कोडिंग’ सुविधेचा गैरफायदा घ्याल, तर खबरदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 06:08 AM2021-04-19T06:08:26+5:302021-04-19T06:08:38+5:30

पाेलीस आयुक्तांचा इशारा; टाेल नाक्यावर फिरुन घेतला आढावा, अत्यावश्यक सेवेच्या खासगी गाड्यांसाठी वापर 

Take advantage of the 'color coding' feature, beware! | ‘कलर कोडिंग’ सुविधेचा गैरफायदा घ्याल, तर खबरदार!

‘कलर कोडिंग’ सुविधेचा गैरफायदा घ्याल, तर खबरदार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, रस्त्यावरील वाहनांची गर्दी राेखण्यासाठी मुंबई पोलिसांकड़ून रविवारपासून खासगी वाहनांसाठी कलर कोडिंग लागू करण्यात आले आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुलुंड, आनंद नगर, दहिसर टोल नाका परिसरात फिरुन आढावा घेतला. गैरफायदा घेतल्यास कारवाईच इशाराही दिला. 


अत्यावश्यक सेवेसाठीच्या खासगी वाहनांवर स्टिकर लावून नागरिकांना या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आवाहन पाेलीस आयुक्तांनी केले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी लाल रंगाचा, भाजीपाल्याच्या वाहनांसाठी हिरव्या, तर सरकारी तसेच अन्य महत्त्वाच्या व्यक्तींसाठी पिवळ्या रंगाचा स्टिकर बंधनकारक आहे­.


कुठे मिळणार स्टिकर?
रंगीत स्टिकर नेमके कुठे उपलब्ध होणार, याबाबत माहिती देताना, पाेलीस आयुक्तांनी सांगितले की, नागरिकांनी स्वतः प्रिंट करून सहा इंच व्यासाचे स्टिकर खासगी वाहनांवर चिटकवावेत, अन्यथा पोलीस विनामूल्य ते चिटकवून देतील.

कोडिंगचा नियम फक्त 
मुंबईपुरताच वैध

कलर कोडिंगचा नियम हा फक्त मुंबईपुरता वैध राहणार असून, ठाणे, मिरा-भाईंदर, नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी त्यांचे नियम काढावेत. त्यांनी याबाबत जाहीर केलेल्या नियमांसाठी आम्ही त्यांना सहकार्य करू, असे पाेलीस आयुक्त नगराळे यांनी सांगितले.

कायदेशीर 
कारवाई करणार

nया स्टिकरचा गैरवापर होत नाही ना, याची पाहणी मुंबई पोलिसांकड़ून करण्यात येईल. याचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. 
nमुंबईतल्या सर्व टोलनाक्यांवर शनिवारी रात्रीपासून 
पोलिसांकड़ून स्टिकर लावण्यास सुरुवात करण्यात आली. रविवारी सकाळी पोलीस आयुक्तांनी दहिसर, मुलुंड, आनंद नगर टोलनाका परिसरात स्वतः हजर राहून वाहनांवर स्टिकर लावले.
 

Read in English

Web Title: Take advantage of the 'color coding' feature, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.