भाईंदरमध्ये राम कदमांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 21:02 IST2018-09-07T21:01:49+5:302018-09-07T21:02:26+5:30

भाईंदरमध्ये राम कदमांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
भाईंदर - भाजपा आमदार राम कदम यांनीदही हंडीवेळी आपल्या जिभेचा काला करीत महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्याचा राज्यभर जोडेमारो आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. परंतु, मीरा-भाईंदर शहर शिवसेनेच्या महिला आघाडीने शहर संघटक नीलम ढवण यांच्या नेतृत्वाखाली थेट कदमांची प्रतिकात्मक अंत्ययात्राच आज काढण्यात आली.
सायंकाळी 7 वाजता भाईंदर पूर्वेकडील नवघरच्या मारुती मंदिरापासून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता. अंत्ययात्रेच्या पुढे ढवण यांनी हाती शिकाळी घेतली होती. तर सहभागी महिलांनी 'भाजपाचा आमदार खाली डोके वर पाय, राम कदम हाय हाय', 'एवढी गर्दी कशाला, राम कदम यांच्या मयताला' अशी घोषणाबाजी केली. शेवटी ही अंत्ययात्रा एस. व्ही. रोड स्मशानभूमीत नेण्यात आली. तेथे दिला अग्नी देण्यात आला. यावेळी नगरसेविका वंदना विकास पाटील, कुसुम गुप्ता, पार्सेकर आदींनी अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता.