ड्रग्जप्रकरणी अभिनेता एजाझ खानवर अटकेची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:07 AM2021-03-31T04:07:27+5:302021-03-31T04:07:27+5:30

एनसीबीकडून चौकशी सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘बिग बॉस’ फेम बॉलीवूड अभिनेता एजाझ खानची ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मंगळवारी अमली ...

Sword of arrest on actor Aijaz Khan in drug case | ड्रग्जप्रकरणी अभिनेता एजाझ खानवर अटकेची टांगती तलवार

ड्रग्जप्रकरणी अभिनेता एजाझ खानवर अटकेची टांगती तलवार

Next

एनसीबीकडून चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘बिग बॉस’ फेम बॉलीवूड अभिनेता एजाझ खानची ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मंगळवारी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने कसून चौकशी केली.

मंगळवारी राज्यस्थानहून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला थेट कार्यालयात पाचारण केले असून, रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर प्रश्नोत्तराच्या फैरी सुरू होत्या. त्याच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

ड्रग्जमाफिया शादाब बटाटाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यापूर्वी सकाळी त्याच्या घरी जाऊन झडती घेतल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

एक्टसी टॅबलेट्सच्या माध्यमातून ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एजाज खानला ऑक्टोबर २०१८ मध्येही अटक करण्यात आली होती. त्याचा पुन्हा ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अटक झाल्यास बॉलिवूडमधील महत्त्वाची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

* कोण आहे एजाझ खान?

एजाझ खानने रक्तचरित्र, अल्लाह के बंदे यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये काम केले आहे. रहे तेरा आशीर्वाद, कहानी हमारे महाभारत की, करम अपना अपना यासारख्या मालिकांमध्येही अभिनय केला आहे. बिग बॉस-७च्या सिझनमुळे ताे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

Web Title: Sword of arrest on actor Aijaz Khan in drug case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.