मुंबईकरांना पोहण्याचे प्रशिक्षण; महापालिकेच्या १० तरण तलावांमध्ये २१ दिवसांचे वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:27 AM2024-04-23T10:27:57+5:302024-04-23T10:30:32+5:30

महानगरपालिकेच्या १० जलतरण तलावांमध्ये उन्हाळी सुट्टीदरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे.

swimming training for mumbaikars 21 days of classes in 10 municipal swimming pools | मुंबईकरांना पोहण्याचे प्रशिक्षण; महापालिकेच्या १० तरण तलावांमध्ये २१ दिवसांचे वर्ग

मुंबईकरांना पोहण्याचे प्रशिक्षण; महापालिकेच्या १० तरण तलावांमध्ये २१ दिवसांचे वर्ग

मुंबई : महानगरपालिकेच्या १० जलतरण तलावांमध्ये उन्हाळी सुट्टीदरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. २ मेपासून २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. याच प्रशिक्षणाचा दुसरा कालावधी २३ मेपासून सुरू होणार आहे. प्रशिक्षणासाठीची नावनोंदणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. 

त्यासाठीची लिंक २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून कार्यान्वित होणार आहे. मुंबईकर नागरिकांना क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिका क्षेत्रात १० तरण तलाव कार्यरत आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने अनेक इच्छुक या क्रीडा प्रकारापासून लांब राहतात. पोहणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जलतरण प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी केली जाणार आहे.

विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. 

२३ मे ते १२ जून या कालावधीतील प्रशिक्षण वर्गाची सभासद नोंदणी ६ मे  पासून सुरू करण्यात येईल. सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे करण्यात आले आहे.

या तलावांमध्ये मिळणार शिकण्याची संधी-

महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलाव, दादर (पश्चिम), जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिंपिक जलतरण तलाव, चेंबूर (पूर्व), सरदार वल्लभभाई पटेल ऑलिंपिक जलतरण तलाव, कांदिवली (पश्चिम), बृहन्मुंबई महानगरपालिका दहिसर (पश्चिम) जलतरण तलाव, कांदरपाडा, दहिसर (पश्चिम), बृहन्मुंबई महानगरपालिका मालाड (पश्चिम) जलतरण तलाव, चाचा नेहरू मैदान, मालाड (पश्चिम), बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पश्चिम) जलतरण तलाव, गिल्बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम), बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पूर्व) जलतरण तलाव, कोंडिविटा गाव, अंधेरी (पूर्व), बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी जलतरण तलाव, वरळी जलाशय टेकडी, वरळी, बृहन्मुंबई महानगरपालिका विक्रोळी जलतरण तलाव, टागोरनगर, विक्रोळी (पूर्व), बृहन्मुंबई महानगरपालिका वडाळा जलतरण तलाव, वडाळा अग्निशमन केंद्र, वडाळा या तरण तलावांमध्ये प्रशिक्षण मिळणार आहे.

Web Title: swimming training for mumbaikars 21 days of classes in 10 municipal swimming pools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.