सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; पाटणा पोलिसांची ‘सरप्राइज व्हिजिट’!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:55 AM2020-08-03T05:55:09+5:302020-08-03T05:56:09+5:30

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; दिशा सालियन प्रकरणाची होणार चौकशी

Sushant Singh Rajput suicide case; 'Surprise visit' of Patna police! | सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; पाटणा पोलिसांची ‘सरप्राइज व्हिजिट’!

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; पाटणा पोलिसांची ‘सरप्राइज व्हिजिट’!

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर ।

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) आत्महत्या प्रकरणात सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येचे काही कनेक्शन आहे का, हे तपासण्यासाठी पाटणा पोलिसांचे पथक शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात अचानक धडकले. मात्र तपास अधिकाऱ्यांची भेट होऊ न शकल्याने त्यांना खाली हात परतावे लागले.

पाटणा पोलिसांनी मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद कनवजे यांना भेटायचे असल्याची विनंती केली. मात्र कनवजे पोलीस ठाण्यात नसल्याचे उत्तर त्यांना मिळाले. त्यामुळे ते तेथून परत गेले. त्यानंतर परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त व्ही. ठाकूर यांनी वरिष्ठांच्या निर्देशानुसार, मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत ते तेथे कागदपत्रांची पडताळणी करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिशाच्या आत्महत्येमुळे सुशांत अस्वस्थ होता, असा त्याच्या कुटुंबाचा दावा आहे. दरम्यान, दिशाची आई वासंती यांनी दिशा सुशांतची मॅनेजर नव्हती, असे नुकतेच एका इंग्रजी वर्तमानपत्रातील मुलाखतीत म्हटले होते. तरीही या प्रकरणी दिशाच्या कुटुंबाची पाटणा पोलीस अधिक चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Sushant Singh Rajput suicide case; 'Surprise visit' of Patna police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.