Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येआधी घरात झाली पार्टी?; मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 01:48 PM2020-08-03T13:48:21+5:302020-08-03T14:03:07+5:30

Sushant Singh Rajput Suicide: सर्व बाजूनं तपास सुरू; आतापर्यंत ५६ जणांची चोकशी; मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती

Sushant Singh Rajput case no party took place before suicide says mumbai police commissioner | Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येआधी घरात झाली पार्टी?; मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येआधी घरात झाली पार्टी?; मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

Next

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide) प्रकरणावरून सध्या मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा संघर्ष सुरू झाल्याचं दिसत आहे. आत्महत्येची घटना मुंबईमध्ये घडली. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाचा अधिकार स्थानिक पोलिसांना आहे. मात्र या प्रकरणी बिहारमध्ये एफआयआर दाखल झाल्यानं तिथले पोलीस मुंबईत आले. त्यांना प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं द्यायची की नाही, यासाठी आम्ही कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.




सुशांत सिंह राजपूतनं १४ जूनला आत्महत्या केली. मात्र या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुशांतनं आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या घरात पार्टी झाल्याची चर्चा होती. मात्र तशी कोणतीही पार्टी झालेली नसल्याची माहिती परमबीर सिंह यांनी दिली. आम्ही या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र तसं काहीही हाती लागलं नसल्याचं परमबीर सिंह म्हणाले. मात्र या प्रकरणात काही घातपात झाला का, त्या अनुषंगानंदेखील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 




सुशांतच्या वडिलांनी आत्महत्या प्रकरणात पाटण्यात एफआयआर नोंदवला. त्यात त्यांनी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी आले आहेत. या प्रकरणात सध्या मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा संघर्ष होत असताना दिसत आहे. त्यावरही परमबीर सिंह यांनी भाष्य केलं. सुशांतचे वडील, त्याची बहिण, त्यांचे पती यांचा जबाब आम्ही १६ जूनला नोंदवला. मात्र त्यावेळी त्यांनी कोणताही संशय नोंदवला नाही. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी अनेकदा संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली.




सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आम्ही आतापर्यंत ५६ जणांचे जबाब नोंदवले आहेत. सगळ्या पैलूंचा विचार करून त्या दृष्टीनं तपास सुरू आहे. सुशांतची आर्थिक, मानसिक स्थिती, शत्रुत्व या सगळ्या गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत. सुशांत मानसिकदृष्ट्या तणावाखाली होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. तो उपचारदेखील घेत होता. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही तपास करत आहोत, असं परमबीर यांनी सांगितलं.

'पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं'; संजय निरुपम यांचा हल्लाबोल

मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMCने जबरदस्तीने केलं क्वारंटाईन, बिहार पोलिसांचा आरोप

आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी सुशांत गुगलवर सतत सर्च करत होता ‘या’ तीन गोष्टी!!

१५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी देशवासीयांना खास गिफ्ट देण्याच्या तयारीत; मोठी घोषणा होणार?

Web Title: Sushant Singh Rajput case no party took place before suicide says mumbai police commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.