सुशांत माळवदे हल्ला; आणखी एकाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनीच शोधले आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:35 AM2017-11-01T01:35:47+5:302017-11-01T01:35:56+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)च्या मालाड विभागाध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आणखी दोघांना भार्इंदरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यात एकाला अटक करण्यात आली असून, अन्य एकाची मालाड पोलीस चौकशी करत आहेत.

Sushant Malwade attacked; Another person arrested, MNS activists found out | सुशांत माळवदे हल्ला; आणखी एकाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनीच शोधले आरोपी

सुशांत माळवदे हल्ला; आणखी एकाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनीच शोधले आरोपी

Next

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)च्या मालाड विभागाध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आणखी दोघांना भार्इंदरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यात एकाला अटक करण्यात आली असून, अन्य एकाची मालाड पोलीस चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे, मनसे कार्यकर्त्यांनीच आरोपी शोधून काढले आहेत.
मालाड पोलिसांनी सोमवारी रात्री दोघांना ताब्यात घेतले. भार्इंदरमधून मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. ज्यात एकाचा माळवदे यांच्यावर केलेल्या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग आहे, तर दुसºयाने त्याला शरण दिल्याचे मनसे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांपैकी एकाची ओळख पटविली आहे. त्यानुसार, त्याला अटक करण्यात आली आहे, तर दुसºयाची चौकशी सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. हे दोघेही फेरीवाले असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी शनिवारी मालाडमध्ये केलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर, मालाडमध्ये मनसैनिक आणि फेरीवाल्यांमध्ये राडा झाला.

असे सापडले दोघे
शनिवारी मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला करून ३० ते ४० हल्लेखोर भार्इंदर पश्चिम स्कायवॉकखाली असलेल्या गाळ्यात लपून बसले. याची माहिती स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना मिळताच, त्यांनी सोमवार रात्रीपासून या ठिकाणी सापळा रचला. त्यात मनसे शहर प्रमुख प्रसाद सुर्वे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. तेव्हा लपून बसलेल्या आणि गावी पळण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडून त्यांचा सहभाग मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला.
त्यांना नंतर भार्इंदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यातील काही हल्लेखोर वडाळा तर काही सुरतला पळाल्याची माहिती आहे.

Web Title: Sushant Malwade attacked; Another person arrested, MNS activists found out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा