Join us  

"...म्हणून चीनी मालावर बहिष्काराचा 'सर्जिकल स्ट्राईक' हवाच"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 12:43 PM

देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई - भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चीनी अ‍ॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही एक ट्विट केलं आहे. चीनी मालावर बहिष्कार घालण्याच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोमवारी (8 जून) या संदर्भात ट्विट केलं आहे.

पुण्यामध्ये ब्राम्हण महासंघातर्फे चीनी मालाची होळी करण्यात येणार आहे. या वृत्ताचा एक व्हिडीओ संजय राऊत यांनी शेअर केला आहे. यासोबतच चीनला धडा शिकवावा लागेल असं देखील म्हटलं आहे. "ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आज पुण्यात चीनी मालाची होळी करत आहेत. वीर सावरकरांनी परदेशी मालाची होळी करण्यासाठी जी जागा निवडली तेथेच हे आंदोलन होत आहे. चीनचे आर्थिक कंबरडे मोडून काढणे हाच एक  surgical strike आहे. चीनला धडा शिकवावा लागेल. वंदे मातरम!" असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी ‘लॉकडाऊन’ काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाब्बासकी दिली. महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची फार मोठी परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुले ते बाबा आमटे. या नावांत आता आणखी एका महान सामाजिक कार्यकर्त्याचे नाव जोडावे लागेल ते म्हणजे सोनू सूद! अशा शब्दांत टोला हाणला होता.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी 'ही' खास मिठाई मदत करणार; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार?

Today's Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले!

CoronaVirus News : ब्लड प्रेशर असलेल्या कोरोनाग्रस्तांना 'ही' चूक पडेल महागात; वेळीच व्हा सावध

CoronaVirus News : लढ्याला यश! भारताने विकसित केलं स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्ट

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाचीन